घरदेश-विदेशमध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ओढली राज ठाकरेंची 'री'!!

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ओढली राज ठाकरेंची ‘री’!!

Subscribe

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांमुळे मध्य प्रदेशात बेरोजगारी असल्याचं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे. मंगळवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून देशात राज ठाकरेंना ओळखले जाते. त्यांच्या ‘खळखट्याक’च्या या कार्यशैलीबद्दल अनेक वेळा टीका देखील झाली आहे. यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी भूमिपुत्रांना नोकऱ्यांना प्राधान्य द्या म्हणून आंदोलन केलं आहे. त्यानंतर परप्रांतीयांना मारहाण देखील करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत राज ठाकरे यांनी कायम भूमिपुत्रांची बाजू घेतली आहे. त्यानंतर आता कमलनाथ यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेची री ओढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांमुळे मध्य प्रदेशात बेरोजगारी असल्याचं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे. मंगळवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. युपी बिहारमधील लोक येथील नोकऱ्या बळकावतात आणि मध्य प्रदेशातील लोक बेरोजगार राहतात असं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं आहे. त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गुजरातमध्ये देखील भूमिपुत्रांच्या मुद्यावरून हिंसाचार झाला होता.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कमलनाथ यांनी राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी योजना जाहीर केली. यावेळी त्यांनी गुंतवणूक करणारे उद्योग, कंपन्या मध्य प्रदेशातील ७० टक्के लोकांना रोजगार देतील. त्यानंतरच त्यांना सवलत दिली जाईल असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. यावरच न थांबता कमलनाथ यांनी राज्यातील उद्योग व्यवसायात ७० टक्के रोजगार भूमिपुत्रांना देण्याच्या नियमावर सही केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधूनल लोक येतात आणि मध्य प्रदेशातील नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे नव्या नियमाच्या फाइलवर सही केल्याचं कमलनाथ यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ हाती घेताच कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं. ४० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

वाचा – २००८ परप्रांतीय मारहाण प्रकरण, राज ठाकरेंना जामीन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -