घरदेश-विदेशहीच वारसदार; सुनेच्या निधनानंतर नुकसानभरपाईचे 1.31 कोटी सासूला देण्याचे न्यायालयाचे आदेश

हीच वारसदार; सुनेच्या निधनानंतर नुकसानभरपाईचे 1.31 कोटी सासूला देण्याचे न्यायालयाचे आदेश

Subscribe

सून श्वेता हिच्या 59 लाख 48 हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि 22 लाख 64 हजार रुपयांच्या व्याजासह एकूण 82 लाख 12 हजार रुपये सहा वर्षांसाठी देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 19 लाख 48 हजार रुपये एफडीच्या स्वरूपात जमा केले जाणार आहेत.

इंदौर: मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये सून आणि मुलाच्या मृत्यूप्रकरणी सासूला 1 कोटी 31 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण स्कीम-94 मधील रहिवासी 29 वर्षीय आयुष आणि 28 वर्षीय पत्नी श्वेता दीक्षित यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. आयुष सेल्स एक्झिक्युटिव्ह होता, तर श्वेता पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर होती. आयुष आणि श्वेता दीक्षित यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. (Madhya Pradesh new mother in law will get the money for the insurance amount of daughter in law)

16 नोव्हेंबर 2016 रोजी दुपारी 1.30 वाजता जेवण करून दोघेही हॉटेलमधून परतत होते. त्यावेळी बॉम्बे हॉस्पिटल चौकाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांची भरधाव कार धडकली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर श्वेताची सासू मालती देवी, सासरे गौरीशंकर दीक्षित आणि दीर दिव्यांश यांनी न्यायालयात अपघाती मृत्यू विम्यावर दावा दाखल केला होता. 25 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयाने व्याजासह 1 करोड 31 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने संपूर्ण रक्कम सासूच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोणाला किती नुकसान भरपाईची रक्कम मिळाली

सून श्वेता हिच्या 59 लाख 48 हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि 22 लाख 64 हजार रुपयांच्या व्याजासह एकूण 82 लाख 12 हजार रुपये सहा वर्षांसाठी देण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 19 लाख 48 हजार रुपये एफडीच्या स्वरूपात जमा केले जाणार आहेत. मुलगा आयुषच्या बाबतीत सहा वर्षांचे 36 लाख 11 हजार रुपये नुकसानभरपाई आणि 13 लाख 74 हजार रुपयांचे व्याज असे एकूण 49 लाख 86 हजार रुपये देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 20 लाख रुपये एफडीच्या स्वरूपात जमा केले जाणार आहेत.

अशा प्रकारे सासूला सुनेच्या निधनानंतर अपघाती मृत्यू प्रकरणी विम्यातून नुकसानभरपाईची रक्कम मिळाली आहे.
सासू ही सून श्वेतावर अवलंबून नसतानाही हिंदू विवाह कायद्यांतर्गत झालेल्या अपघातामुळे सासू मात्र सुनेच्या सुखापासून वंचित राहिल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सासू-सुनेचे प्रेम, वात्सल्य, मार्गदर्शन, देखभाल सगळंच चुकलं. यामुळे सुनेच्या मृत्यूची भरपाईही तिच्या सासूला मिळावी. सासरे मरण पावल्यानं ही रक्कम मालतीदेवीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: जनधन खात्यांमध्ये एकूण ठेवी 2 लाख कोटी रुपयांहून जास्त, सरकारने दिली माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -