घर देश-विदेश मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली, कारण..., ममता बॅनर्जींचे शरसंधान

मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली, कारण…, ममता बॅनर्जींचे शरसंधान

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या कपातीबद्दल ट्वीट केले आहे. रक्षाबंधनाचा सण कुटुंबात आनंद वाढवणारा दिवस आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पण यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, ही कमाल ‘INDIA’ची असल्याचे सांगत मोदी सरकारवर शरसंधान केले आहे.

- Advertisement -

गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या कपातीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करताना, रक्षाबंधनाचा सण कुटुंबात आनंद वाढवणारा दिवस आहे. गॅसच्या किमती कमी झाल्यामुळे माझ्या कुटुंबातील बहिणींच्या सुखसोयी वाढतील आणि त्यांचे जीवन सुसह्य होईल, माझी प्रत्येक बहीण सुखी, निरोगी, आनंदी राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे म्हटले आहे.

हेही वाचा – I.N.D.I.A.आणि राज्यातील NDAच्या एकाच दिवशी मुंबईत बैठका; महायुतीचा अजेंडा काय?

- Advertisement -

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्यात आल्याची घोषणा करतानाच, ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’अंतर्गत 75 लाख नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. याच्या लाभार्थींना आधीच 200 रुपयांची सबसिडी मिळत आहे, पण त्यांनाही कमी झालेल्या दराचा फायदा होईल. म्हणजेच ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांची आता प्रति सिलेंडर एकूण 400 रुपयांची बचत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ट्वीट करत, आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना स्वयंपाकाच्या गॅसवर 400 रुपये सबसिडी मिळेल आणि इतर सर्व ग्राहकांना स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 200 रुपयांची सूट मिळेल, असे म्हटले आहे.

हेही वाचा – मोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिलिंडरच्या दरातील कपातीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन महिन्यांत ‘इंडिया’ आघाडीच्या केवळ दोन बैठका झाल्या आणि आज आपण पाहत आहोत की, एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी झाली आहे. हा आहे I.N.D.I.A.चा दम! असे ट्वीट त्यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांची पोस्ट आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेअर केली आहे.

- Advertisment -