घरदेश-विदेशयेथे चक्क कुत्र्यांनी केलं रक्तदान!

येथे चक्क कुत्र्यांनी केलं रक्तदान!

Subscribe

रस्त्यावरील प्राण्यांना तसंच पाळीव प्राण्यांना काही इजा झाल्याल आणि रक्ताची गरज भासल्यास ते या ब्लड बँकमधून रक्त घेऊ शकतात.

आपल्या आसपास अनेक सामाजिक संस्था तसंच सरकारी रुग्णालयं नियमीतपणे रक्तदान शिबीराचं आयोजन करत असतात. अपघात झालेल्या किंवा रक्ताची कमतरता असलेल्या रुग्णांसाठी रक्ताची खूप मोठी गरज भासते. तसंच बरेचदा ऑपरेशन करतेवेळीसुद्धा ऐनवेळी रक्ताची गरज भासते. अशा ईमर्जन्सीच्यावेळी रक्तदान शिबीरातून जमा करण्यात आलेलं रक्त वापरलं जातं. आता माणसांसाठी भरवण्यात येणारी रक्तदान शिबीरं तुम्ही पाहिली असतील पण नुकतंच खास कुत्र्यांसाठी एक रक्तदान शिबीर घेण्यात आलं. चेन्नईच्या मद्रास व्हेटर्निटी कॉलेजतर्फे भरवण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात माणसांप्रमाणेच कुत्र्यांनी रक्तदान केलं. एकूण ५० कुत्र्यांचा यामध्ये सहभाग होता. कुत्र्यांनीच रक्तदान केलेल्या या रक्तदान शिबीराचं तसंच या अनोख्या उपक्रमाचं, सध्या सोशल मीडियामध्ये कौतुक होत आहे.

 

- Advertisement -


शिबीराचा उद्देश काय?

कुत्र्यांना किंवा अन्य प्राण्यांना रक्ताची गरज भासल्यास त्याकरता एक ब्लड बँक तयार असावी, या उद्देशातून हे शिबीर भरवण्यात आलं होतं. उपलब्ध माहितीनुसार, या शिबीरात जमा झालेलं रक्त तनुवास रक्तपेढीमध्ये साठवलं जाणार आहे. रस्त्यावरील प्राण्यांना तसंच पाळीव प्राण्यांना काही इजा झाल्याल आणि रक्ताची गरज भासल्यास ते या ब्लड बँकमधून रक्त घेऊ शकतात. दरम्यान, माणसांप्रमाणे रक्तदान करण्यासाठी शिबीरात आलेल्या कुत्र्यांची आधी तपासणी करण्यात आली. त्यानंतर सहभागी झालेल्या ५० कुत्र्यांपैकी एकूण ११ कुत्र्यांनी यशस्वी रक्तदान केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -