घरदेश-विदेशसुलतानपूरमध्ये मनेका गांधी आणि सोनू सिंग यांच्यात मतदानकेंद्राबाहेर बाचाबाची

सुलतानपूरमध्ये मनेका गांधी आणि सोनू सिंग यांच्यात मतदानकेंद्राबाहेर बाचाबाची

Subscribe

सुलतानपूरमध्ये महाआघाडीचे उमेदवार चंद्र भद्र सिंह उर्फ सोनू सिंह आणि सुलतानपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार तसंच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले.

उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. सहाव्या टप्प्यातील हे मतदान ७ राज्यातील ५९जागांकरिता होत आहे. या होणाऱ्या मतदानात ९७९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त होणार आहे. सुलतानपूरमध्ये महाआघाडीचे उमेदवार चंद्र भद्र सिंह उर्फ सोनू सिंह आणि सुलतानपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार तसेच केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले. सोनू सिंग यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप मनेका गांधी यांनी केला आहे.

- Advertisement -

रविवारी सकाळी सोनू सिंग आणि मनेका गांधी हे दोन्ही उमेदवार आपापल्या कार्यकर्त्यांसह आमनेसामने आले त्यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. त्यावेळी मनेका गांधी यांनी सोनू सिंग यांना ‘तुमची दादागिरी चाळणार नाही’ असा इशारा दिला. यावेळी तेथील महाआघाडीचे उमेदवार सोनू सिंग यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यापुर्वी शनिवारच्या रात्री सुलतानपूरच्या केंद्रीय मंत्री तसेच भाजपाच्या उमेदवार मनेका गांधीच्या समर्थकांसह मारहान करण्याची सूचना देखील देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार सपा आणि बसपा महाआघाडीचे उमेदवार सोनू सिंग यांच्या समर्थकांनी मनेका गांधीच्या प्रचारादरम्यान गांधीच्या लोकांना मारहान करत त्यांच्या गाड्यांचे नुकसान केले.

- Advertisement -

यावेळी, मनेका गांधीच्या काही लोकांनी मतदानाकरिता रात्रीच्या वेळात गावा-गावात जाऊन पैशांचे वाटप केल्याचे उमेदवार सोनू सिंग यांच्या समर्थकांनी सांगितले. सुलतानपूरचे पोलिस अधिक्षक अनुराग वत्स यांनी असे सांगितले की, रात्रीच्या प्रकाराची माहिती मिळताच तपास या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -