घरदेश-विदेशMahua Moitra : 'भाजपाच्या अंताची सुरुवात'; खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा संतप्त

Mahua Moitra : ‘भाजपाच्या अंताची सुरुवात’; खासदारकी रद्द झाल्यानंतर महुआ मोईत्रा संतप्त

Subscribe

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणी महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई झाली आहे. लोकसभेच्या एथिक्स कमिटीने महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती. यानुसार महुआ मोईत्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारवाईनंतर महुआ मोईत्रा संतप्त झाल्या आहेत. एथिक्स कमिटीला माझी हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही, परंतु माझ्यावरील कारवाईमुळे आता भाजपाच्या अंताची सुरुवात झाली आहे. (The beginning of the end of the BJP Mahua Moitra angry after cancellation of MPship)

हेही वाचा – Pimpri Chinchwad Fire : अजित पवारांकडून आर्थिक मदत तर, सुप्रिया सुळेंकडून सखोल चौकशीची मागणी

- Advertisement -

महुआ मोईत्रा यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी संसदेच्या संकुलातून सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना महुआ मोईत्रा म्हणाल्या की, अस्तित्वात नसलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मी दोषी आढळून आले आहे. परंतु मी आता 49 वर्षांची आहे. त्यामुळे मी पुढील 30 वर्षे संसदेच्या आत आणि बाहेर तुमच्याशी (भाजपाशी) लढेन.

- Advertisement -

भाजपच्या अंताची सुरुवात – महुआ

निलंबित झाल्यानंतर संतप्त झालेल्या महुआ मोइत्रा म्हणाल्या की, एथिक्स कमिटीला मला निलंबित करण्याचा अधिकार नाही. पण ही तुमच्या (भाजपा) अंताची सुरुवात आहे. जर मोदी सरकार विचार करत असेल की, मला गप्प करून ते अदानी प्रकरण संपुष्टात आणतील, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, संसदेने केवळ संपूर्ण भारताला दाखवून दिलेली घाई आणि योग्य प्रक्रियेचा गैरवापर तुम्ही केला आहे. अदानी किती महत्त्वाचे आहेत तुझ्यासाठी? तुम्ही एकट्या महिला खासदाराला वश करण्यासाठी आणि तिला रोखण्यासाठी किती प्रमाणात त्रास देऊ शकता?, असे प्रश्न महुआ मोईत्रा यांनी उपस्थित केले.

हेही वाचा – Winter Session : विरोधकांच्या अनुपस्थितीत तीन विधेयके मंजूर, मविआ नेते विधानसभा अध्यक्षांवर नाराज

महुआ मोईत्रा यांच्या निलंबनावर विरोधकांचे टीकास्त्र

टीएमसी पक्षाचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी महुआ मोइत्राची संसदेतून हकालपट्टी केल्यानंतर म्हटले की, महुआ मोइत्रा यांना न्याय मिळाला नाही. तर दुसरीकडेकाँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले की, हा निराधार तथ्यांच्या आधारे आणि सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -