घरदेश-विदेशमोदींना ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’चा सर्वोच्च नागरी पुरस्कार

मोदींना ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’चा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवच्या ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने आज गौरविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मालदीवच्या दौऱ्यावर असून मोदी यांना या दौऱ्यात मालदीवच्या ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते एका द्विपक्षीय कार्यक्रमात बहाल करण्यात आला आहे. तसेच मारदीवच्या भेटीवर आलेल्या मोदींनी सोलिह यांना टीम इंडियाची एक बॅट भेट दिली असून विशेष म्हणजे यावर भारतीय क्रिकेट टीममधील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

- Advertisement -

मालदीवचा पहिला दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवमध्ये पोहोचल्यानंतर त्यांचे राजधानी माले येथील विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, हा पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या काळात मालदीवचा हा माझा पहिलाच परदेश दौरा आहे. तसेच हा माझा सन्मान ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले त्याचा मी आनंदाने स्विकार करतो. हा सन्मान दोन्ही देशांच्या संबंधांचा सन्मान आहे. भारत प्रत्येक वर्षी, प्रत्येक अडचणीच्या काळात मालदीवसोबत असेल, दोन्ही देशांच्या जनतेला विकास आणि स्थिरता हवी आहे. तसेच भारताच्या सहकार्यासाठी आमची पूर्ण सहमती आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये संपर्क वाढावा यासाटी आम्ही दोन्ही देसांदरम्यान नौका सेवा सुरु करण्यालाही सहमती जाहीर केली आहे. तसेच भारत मालदीवला प्रत्येक शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे‘.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -