घरमहाराष्ट्रकिरीट सोमय्यांच्या व्हिडीओ प्रकरणात चित्रा वाघ यांची थेट प्रतिक्रिया, म्हणाल्या "मी इथेच.."

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओ प्रकरणात चित्रा वाघ यांची थेट प्रतिक्रिया, म्हणाल्या “मी इथेच..”

Subscribe

चित्रा वाघ यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकरणी कोणतेही मत व्यक्त न केल्याने त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येऊ लागले. सोमय्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर चित्रा ताई कुठे आहेत? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर आता चित्रा वाघ यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ मागील आठवड्यात एका वृत्तवाहिनीकडून प्रसिद्ध करण्यात आला. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. किरीट सोमय्या यांच्या या प्रकरणाचे हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. परंतु या प्रकरणात चर्चा केली जाऊ लागली ती चित्रा वाघ यांची. कारण चित्रा वाघ या कायमचं महिलांच्या हक्कासाठी लढत असतात. पण त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्याचा अशा पद्धतीने आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांनी यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Chitra Wagh’s direct reaction to Kirit Somaiya’s video case)

हेही वाचा – ‘मला सांगितलं तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा’,फडणवीसांनी सांगितला सत्तांतराचा धक्कादायक क्लायमॅक्स

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रकरणी कोणतेही मत व्यक्त न केल्याने त्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येऊ लागले. सोमय्यांचे प्रकरण समोर आल्यानंतर चित्रा ताई कुठे आहेत? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला. ज्यानंतर आता चित्रा वाघ यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. “मी इथेच आहे कुठेही गेलेली नाही. किरीट सोमय्या प्रकरणी कुणी ताई समोर आली पाहिजे. जो प्रकार झाला तो चुकीचा झालाच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हाऊसमध्ये याबाबत आश्वासन दिलं आहे. या प्रकाराने आम्हाला धक्का बसला आहे. भविष्यात याची पाळंमुळं शोधली जातील,” असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.

तसेच, त्यांनी मणिपूरमध्ये महिलांसोबत घडलेल्या घटनेचा देखील विरोध केला आहे. “मणिपूरच्या घटनेचा मी निषेध करते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांना केवळ राजकारण करायचे आहे. चर्चेला तयार झाल्यानंतर विरोधक मागे गेले. कारण राहुल गांधी हे संसदेत नाहीत, त्यामुळे याचे राजकारण केले जात आहे. सगळ्यांनी मिळून अशा घटनेला विरोध केला आहे. मणिपूरबरोबर इतर ठिकाणी घडलेल्या घटनेवर विरोधक बोलत नाहीत,” असे म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीमध्ये हे होणारच होते…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून यामुळे राज्याच्या राजकारणात खूप मोठे बदल झाले आहेत. चित्रा वाघ या देखील आधी राष्ट्रवादीमध्येच होत्या. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. पण आता भाजपला राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाची साथ मिळाल्याने या दोन्ही पक्षातील अनेक जण ज्यांचे एकमेकांमध्ये वाद आहेत असे समोरासमोर आले आहेत. रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामधील शीतयुद्ध तर महाराष्ट्रातील राजकारणात गाजलेला विषय होता. त्यामुळे याबाबत चित्रा वाघ यांना विचारण्यात आले असता, त्या म्हणाल्या की, आम्ही अजितदादा यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्याचे आम्ही स्वागत केले. रुपाली चाकणकर आणि माझे काही बांधाला बांध नाही. जिथे गोष्टी मनाला पटत नाही तिथे आम्ही बोलून दाखवू. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे झाले ते नवीन नाही. ते होणारच होते, कधी होणार हे फक्त माहीत नव्हते. पण झाले आता, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -