घरदेश-विदेशमनोहर पर्रिकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

मनोहर पर्रिकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

Subscribe

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे अशी माहिती आता कळत आहे.

प्रकृती अस्वास्थामुळे गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सध्या घरातूनच राज्याचा गाढा हाकत आहेत. त्यावरून विरोधकांनी देखील अनेक सवाल केले. अगदी घरावर मोर्चा देखील काढला गेला. मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल अनेक सवाल देखील विचारले गेले. पण, साऱ्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. तशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांना याबद्दल कल्पना देण्यात आली आहे. यापूर्वी देखील मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. मनोहर पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. यावर मनोहर पर्रिकर राज्याचा कारभार यशस्वीपणे हाकत आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधार होत आहे. शिवाय, त्यांनी मिटिंग देखील घेतल्या असल्यानं भाजपनं न्यायालयामध्ये स्पष्ट केलं आहे.

वाचा – ‘भाजप सत्तेसाठी मनोहर पर्रिकरांच्या जिवाशी खेळतंय’

दरम्यान, मनोहर पर्रिकर घेत असलेल्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न चर्चिले जाण्याची शक्यता आहे. शिवाय, काही आमदारांना देखील मनोहर पर्रिकर यांना भेटण्याची इच्छा आहे. त्यामुळे सोमवारच्या बैठकीकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

- Advertisement -

वाचा – राजीनाम्यासाठी मनोहर पर्रिकरांच्या घरावर मोर्चा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -