घरमहाराष्ट्रमुनगंटीवार यांचा निरुपमविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

मुनगंटीवार यांचा निरुपमविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

Subscribe

अवनी मृत्यूप्रकरणी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. निरुपम यांनी १० नोव्हेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांच्यावर अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आरोप केले होते. आंतरराष्ट्रीय तस्करांशी मुनगंटीवार आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. त्यावर सुधीर मुंगटीवार यांनी हा दावा ठोकला आहे. मुनगंटीवार यांच्यासह भाजप नेत्यांचे तस्करांशी संबंध आहेत. त्यातून अवणीची हत्या झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जंगलकटाई झाल्याचे निरुपम यांनी म्हटल्याचे मुनगंटीवारांचे वकील शुकुल यांनी सांगितले. दरम्यान, निरुपम यांना समन्स जारी करायचे, की नाही यावर न्यायालय आज निर्णय घेणार असल्याचे शुकुल यांनी सांगितले.

अवनीच्या शिकारीचं पापही माथी घ्या – उद्धव ठाकरे

- Advertisement -

अवनी वाघीण मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन

निरुपम यांना दिलेले चोख प्रत्युत्तर 

यापूर्वीही सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले होते की, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हिनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. सत्याचा निर्घृण खून निरुपम यांनी केला आहे. त्यामुळं त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार. तसेच अवनी वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात निरुपम यांनी मुनगंटीवार यांच्यावर जे गंभीर आरोप केले ते मुनगंटीवार यांनी फेटाळून लावले होते.

- Advertisement -

अवनी शिकार प्रकरण: गडकरींनी केली मुनगंटीवारांची पाठराखण

अवनीबाबत पोस्टमॉर्टममधून धक्कादायक माहिती समोर

अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

काय म्हणाले होते निरुपम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला असल्याचा दावा सातत्याने करत असतात. महाराष्ट्राचे वन-पर्यावरणमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना संपूर्ण महाराष्ट्रात बांधलेल्या शौचालयांचा आकडा सांगतात. मात्र, आज त्यांच्याच चंद्रपूर जिल्ह्यात लोक उघड्यावर शौचास जात आहेत. सरकारच्या या अपयशामुळे आज एका अवनीला जीव गमवावा लागला. उद्या हीच वेळ दुसऱ्या अवनीवर आली तर काय करणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -