घरदेश-विदेशमेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार

मेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार

Subscribe

बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरु्दध जगभरात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. सतत माहिती पाठपुरावा केल्यानंतर इंटरपोलकडून मेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब नॅशनल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. इंटरपोलकडून ही माहिती भारताला देण्यात आली आहे. इंटरपोलनं सांगितलेल्यानुसार, अमेरिकेत रेड कॉर्नर नोटीस येण्याआधीच मेहुल चोक्सी फरार झाला. तसंच मेहुल चोक्सीचा सध्या कुठेही पत्ता नसल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरु्दध जगभरात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रत्यार्पणात येऊ शकते बाधा

जगभरात मेहुल चोक्सीविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली असली तरीही मेहुलचा पत्ता लागेपर्यंत प्रत्यार्पणाच्या बाबतीत बाधा येऊ शकते. मेहुल चोक्सी सध्या कुठे आहे? त्याचा शोध घेणं चालू आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतानं इंटरपोलकडून त्याच्या नव्या ठिकाणीची माहिती मागवली आहे. मात्र इंटरपोलकडे सध्या कोणतीही माहिती नाही.

- Advertisement -

भारताला मोठा झटका

भारतानं अमेरिकेकडून ‘प्रत्यार्पण कायदा १९९९’ अन्वये मेहुल चोक्सीला सोपवण्याची मागणी केली होती. मात्र, आता वॉशिंग्टनस्थित इंटरपोलनं मेहुल चोक्सी अमेरिकेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. इंटरपोलच्या या माहितीनंतर सरकारला आता मोठा झटका बसला आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला इतक्यात भारतात आणणं आता सरकारला शक्य नाही.

मेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार

साधारण १५ दिवसांपूर्वी इंटरपोलनं दोन्ही आरोपींविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावली. ईडीनं नीरव मोदीला हाँगकाँगमधून तर मेहुल चोक्सीला अमेरिकेतून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. मात्र सतत माहिती पाठपुरावा केल्यानंतर इंटरपोलकडून मेहुल चोक्सी अमेरिकेतून फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नीरव – मेहुलवर घोटाळ्याचा आरोप

याच वर्षी फेब्रुवारीमध्ये पीएनबी घोटाळ्यात १३ हजार ४०० कोटी रुपये फसवणुकीच्या घोटाळ्यात नीरव आणि मेहुलचं नाव आलं आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साथीनं हा मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप दोघांवरही आहे. ईडी आणि सीबीआयचा तपास चालू असून अजूनही दोघांचा पत्ता लागलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -