घरताज्या घडामोडीकरोनाच्या चाचण्यांसाठी डब्लू एच ओ ला उंदीर मिळेनात

करोनाच्या चाचण्यांसाठी डब्लू एच ओ ला उंदीर मिळेनात

Subscribe

संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या करोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधक कामाला लागले आहेत. मात्र डिसेंबर महिन्यापासून मृत्यूचे थैमान घालणाऱ्या या व्हायरसचा नायनाट करण्यासाठी आवश्यक ती लस निर्माण करण्यात अद्यापही संशोधक चाचपडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतीच यामागची विविध कारणं सांगितली. त्यात करोनाच्या चाचण्यांसाठी उंदरांची कमतरता असल्याचेही समोर आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

करोना व्हायरसचा प्रभाव व गांभीर्य़ बघून जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जागतिक महामारी म्हणजे साथीचे संकट घोषित केले आहे. त्याचबरोबर सर्वच देशांनी यावर उपाययोजना कराव्यात असे अपीलही केले आहे. यावेळी करोनाला रोखण्यासाठी लस निर्मिती करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र करोनाच्या चाचणीसाठी आवश्यक असलेल्या इतर गोष्टींबरोबरच ज्यांच्यावर प्राथमिक चाचणी करावी लागते ते उंदीरही उपलब्ध होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. करोना लस लवकरात लवकर निर्माण करणे गरजेचे असल्याचेही डब्ल्एचओने म्हटले होते. ब्‍लूमबर्ग डॉटइननेही करोनावरील औषध विकसित करण्यासाठी उंदरांची कमतरता असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

कुठल्याही औषधाची निर्मिती करण्यासाठी प्राथमिक चाचण्या कराव्या लागतात. यात प्राणी महत्वाची भूमिका बजावत असतात. संशोधक कुठलेही नवीन औषध निर्माण केल्यानंतर उंदरावर त्याचा प्रयोग करतात. करोनाच्या बाबतीतही तेच घडत आहे. करोनाची लस बनवण्यासाठी संशोधकांना उंदरांवर विविध चाचण्या कराव्या लागत आहेत. मानव व काही ठराविक जातीतील उंदीर यांच्यातील विशेष गुणसूत्रात साम्यता आहे. यामुळे कुठलेही नवीन औषध निर्माण करताना या उंदरांवर त्याचा प्रयोग केला जातो. तो यशस्वी झाल्यानंतरच औषधाला मान्यता दिली जाते. यामुळे संशोधनासाठी एसीई २ नावाच्या मानवी गूणसूत्राशी साम्य गुणसूत्र असलेल्या उंदरांचा प्रयोगशाळेत वापर केला जातो. पण सध्या या उंदरांची कमतरता जाणवू लागली आहे.

जगभरात रोज नवीन नवीन आजारांवर संशोधन केले जाते. यामुळे या खास गुणसूत्र असलेल्या उंदरांना वैद्यकिय विश्वात मोठी मागणी आहे. त्या तुलनेत मागणीनुसार उंदरांचा पुरवठा नसल्याने करोनावर लस शोधण्यास विलंब होत असल्याचे ब्‍लूमबर्ग डॉटइनने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -