घरव्हिडिओनाशिकमध्ये रंगपंचमीची धूम

नाशिकमध्ये रंगपंचमीची धूम

Related Story

- Advertisement -

नाशिकची रंगपंचमी म्हणजे तुफान धम्माल. पण यावेळची रंगपंचमी नाशिककरांसाठी हटके होती. कारण सगळीकडे करोना व्हायरसचे सावट असतानाही नाशिककरांनी रंगपचमी करोनाच्या ठेक्यावरच साजरी केली. खरंतर नाशिकची रंगपंचमी म्हणजे पेशवेकालीन रहाडी. म्हणजे रंगाच्या पाण्याने भरलेला हौद. या रहाडीत उड्या मारल्याशिवाय नाशिककरांची रंगपंचमी रंगतच नाही. त्यात यावेळी भर पडली ती कलर शॉवरची. यामुळे यावेळची रंगपंचमी नाशिककरांसाठी खास ठरली आहे. पंचवटीचा शनी चौक, गाडगे महाराज पुलाजवळचा दिल्ली दरवाजा, तिवंथा चौक आणि जुने नाशिक येथे रहाडीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल ४५ वर्षांनंतर काझीपुरा येथे रहाड खोदण्यात आल्याने नाशिककरांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

- Advertisement -