घरमुंबईपत्रीपुलाचे गर्डर ठेवण्यासाठी पालिकेला खुली जागा मिळेना

पत्रीपुलाचे गर्डर ठेवण्यासाठी पालिकेला खुली जागा मिळेना

Subscribe

पत्रीपूलाच्या कामात सतत अडथळे येत आहेत. पुलाचे लोखंडी गर्डर आणि साहित्य ठेवण्यासाठी महापालिकेला खुली जागा मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.

नवीन पत्रीपुलाच्या कामासाठी लोखंडी गर्डर व साहित्य उपलब्ध झाले आहेत. मात्र हे साहित्य ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मोकळी जागेची आवश्यकता आहे. ही मोकळी जागा मिळत नसल्याने कामास विलंब होत आहे. पत्रीपुलालगतच्या एका गृहनिर्माण संस्थेने आपल्या मोकळया जागेत साहित्य ठेवण्यास परवानगी दिली हेाती. मात्र प्रत्यक्ष कामाच्या वेळी त्या गृहनिर्माण संस्थेने हरकत घेतल्याने हे काम रखडले आहे. ही जागा घेतल्याशिवाय पर्याय उपलब्ध नसल्याने याबाबत महापालिका आयुक्तांची आणि गृहनिर्माण संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीशी चर्चा सरू आहे अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली.

गृहनिर्माण संस्थेच्या हरकतीमुळे कामास विलंब

भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याचे सहापदरी रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. या रुंदीकरणाच्या कामात पत्रीपुल येथे नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश आहे. सदर पत्रीपुलाची एकूण लांबी ११० मीटर असून, त्याची रुंदी ११ मीटर आहे. एकूण लांबीमध्ये ७७ मीटर व ३३ मीटर लांबीच्या लोखंडी गर्डरचा समावेश आहे. सदरचे लोखंडी गर्डर स्तंभावर आणि पायावर ठेवण्याकरिता लागणारे सर्व साहित्य बांधकाम स्थळी उपलब्ध करण्यात आलेले आहे. लोखंडी गर्डरसाठी तात्पुरती जागा आवश्यक आहे. हे लोखंडी गर्डर ठेवण्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात पत्रीपुलालगत असलेल्या ‘लोकसुरभी कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन्स लिमिटेड’ या गृह संस्थेच्या खुल्या जागेचा वापर करावा लागणार आहे. या जागेचा वापर करण्यासाठी महामंडळाने या गृह संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीशी संपर्क साधुन परवानगी देण्याबाबत विनंती केली होती. त्याप्रमाणे या गृह संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीने परवानगीही दिली होती. मात्र प्रत्यक्ष काम करतेवेळेस या गृहनिर्माण संस्थेने हरकत घेतल्यामुळे कामास सुरुवात होऊ शकलेली नाही. यामुळे लोखंडी गर्डर स्तंभावर आणि पायावर ठेवण्याच्या कामास विलंब होत आहे.

- Advertisement -

पत्रीपुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार

ही अडचण सोडविण्याच्या दृष्टीने ९ मार्च रोजी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरीडीसीचे अधिकारी आणि केडीएमसी आयुक्त तसेच उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती. ही जागा घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याची खात्री करून ही जागा तात्पुरत्या स्वरुपात वापरण्यासाठी आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हे ‘लोकसुरभी कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन्स लिमिटेड’ या संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीसोबत चर्चा करणार असल्याचे एमएसआरडीसीतर्फे सांगण्यात आले आहे. या जागेबाबतचा अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाकरिता आवश्यक असणारे काम हाती घेऊन, हा पुल लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -