घरदेश-विदेशMiss World 2023 : 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा मान भारताला; काश्मीरमध्ये होणार...

Miss World 2023 : 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा मान भारताला; काश्मीरमध्ये होणार स्पर्धा

Subscribe

मिस वर्ल्ड 2023 ब्यूटी पेजेंट सोहळ्याचं आयोजन यावर्षी भारतात करण्यात येणार आहे. यंदाची 71वी मिस वर्ल्ड स्पर्धाचं यजमानपद हे भारताला देण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये Miss World CEO Julia Eric Moerly यांनी याबद्दची माहिती दिली आहे.

मिस वर्ल्ड 2023 ब्यूटी पेजेंट सोहळ्याचं आयोजन यावर्षी भारतात करण्यात येणार आहे. यंदाची 71वी मिस वर्ल्ड स्पर्धाचं यजमानपद हे भारताला देण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये Miss World CEO Julia Eric Moerly यांनी याबद्दची माहिती दिली आहे. जागतिक स्तरावरील ही स्पर्धा यंदा डिसेंबर महिन्यात रंगणार आहे. 130 देशातील सौंदर्यवती यामध्ये सहभागी होणार आहेत. 8 डिसेंबर 2023 या दिवशी ही स्पर्धा रंगणार आहे. (Miss World 2023 Honor of 71st Miss World pageant to India The competition will be held in Jammu and Kashmir)

मिस वर्ल्ड ही 1951 पासून दरवर्षी आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. धर्मादाय कार्यांना प्रोत्साहन देताना सौंदर्य, प्रतिभा आणि बुद्धिमत्ता सादर करणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अशी माहिती दिली आहे. विश्वसुंदरी स्पर्धा 2023 ही 71 वी स्पर्धा आहे. भारतानं यापूर्वी 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ही स्पर्धा बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती. भारतात 27 वर्षांची पुन्हा एकदा यजमानपद आलं आहे. जवळपास महिनाभर ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतासह 130 देशांतील सुंदरी सहभाग घेणार आहेत.

- Advertisement -

विश्व सुंदरी स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होणार असून, याच्या तारखा ठरलेल्या नाहीत. त्यानंतर जाहीर केल्या जातील. तसंच, जागाही ठरलेली नाही, असं मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया मोर्ले यांनी सांगितलं. ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी, मानुषी चिल्लर या भारताच्या लेकींनी आतापर्यंत या सन्मानावर आपलं नाव कोरलं आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात येणरा असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. स्त्रियांच्या सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणं हा मिस वर्ल्ड या किताबाचा मुख्य उद्देश असतो.

(हेही वाचा: Pakistan : इम्रान खान यांना दिलासा, हायकोर्टाकडून तीन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -