घरदेश-विदेशमोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात

मोदींकडून राखी पौर्णिमेनिमित्त महिलांना भेट; गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपये कपात

Subscribe

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणि वाढती महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार आता विविधांगी योजना राबवित आहे.

नवी दिल्ली : महागाईतून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार पाऊले उचलत आहे. दरम्यान 29 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात केली आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. तर याआधीच पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतून 200 रुपयांची सबसिडी मिळत होती आता पुन्हा दोनशे रुपयांची कपात केल्याने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 400 रुपयांचा लाभ झाला आहे. तर उद्याच्या रक्षणाबंधनाआधी केंद्र सरकारने महिलांना सिलिंडरच्या दर कपातीतून भेट दिली आहे. (Modi gifts women on Rakhi Poornima; 200 rupees reduction in gas cylinder price)

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणि वाढती महागाई थांबविण्यासाठी केंद्र सरकार आता विविधांगी योजना राबवित आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली असल्याची माहिती दिली आहे. मोदी सरकारच्या काळात गॅस सिलिंडरच्या किंमती उत्तरोत्तर वाढतच गेल्या. आजच्या घडीला सिलिंडरचा भाव 1150 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सरकार टीकेच्या रडारवर होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सिलिंडरच्या दराच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

अनुदानात आणखी पडली भर

मागील अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधकांच्या रडारवर आहे. विरोधक मोदी सरकारवर महागाईचा मुद्दा घेऊन टीका करीत असतात. हाच मुद्दा चांद्यापासून बांध्यापर्यंत चर्चीला जात असल्याने मोदी सरकारने पुन्हा एकदा त्यांचे स्वस्ताईचे कार्ड वापरण्यास सुरुवात केली. दरम्यान आज केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात केली असल्याने 8500 रुपये कोटी खर्च करणाऱ्या केंद्र सरकारला आता या दोनशे रुपयांच्या स्वस्ताईमुळे 7500 कोटी रुपये अधिकचे लागणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी स्वत:ला शोधा, आनंद महिद्रा यांचा ‘त्या’ विद्यार्थ्यांना सल्ला

असे आहेत सध्याचे दर

ऑगस्ट महिन्यात मुंबईत सिलिंडरचे दर 1 हजार 102 रुपये तर पश्चिम बंगालमध्ये 1 हजार 129 रुपये एवढे होते. दरम्यान आज केलेल्या दर कपातीनंतर या किंमतीमध्ये तब्बल 200 रुपये कमी लागणार असून, राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे बहिणींसोबतच आता भावांच्या खिशाला बसणाऱ्या चापातून सुटका होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : Miss World 2023 : 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा मान भारताला; काश्मीरमध्ये होणार स्पर्धा

शेवटचे बद झाले होते मार्चमध्ये

मार्च 2023 पर्यंत सरकारी आकडेवारीनुसार, सरकारने उज्ज्वला योजनेत 9 कोटीहून अधिक मोफत गॅस कनेक्शन दिले आहेत. देशात 14.2 किलो घरगुती एलपीजी दरात शेवटचे 1 मार्च रोजी बदल झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -