जगभरात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत, ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. काही राज्यातील लोकांना काही फळे आणि भाज्यांची माहिती नसते. अशातच लसोडा नावाचे हे एक असेच एक फळ आहे. ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. त्यामुळे या फळाला देशातील दुर्मीळ फळांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
तसेच या फळाच्या दुर्मिळतेचे आणखी एक कारण म्हणजे हे फळ हळूहळू नामशेष होत आहे आणि त्याची नवीन झाडे लावली जात नाहीत. या फळाला लासोडेला गौंडी आणि निसोरी असेही म्हणतात. या फळाचे शास्त्रीय नाव Cordia myxa असे आहे. हे फळ दिसायला लहान असले तरी त्याचे असंख्य आरोग्य फायदे आहेत. या फळापासून लोणचे, पावडर आणि चटणी हे पदार्थ बनवले जातात.
- Advertisement -
- ज्या लोकांना या फळाबद्दल माहिती आहे ते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी याचा वापर करतात.
- द्राक्षासारखे दिसणारे हे फळ फक्त मे आणि जून महिन्यातच मिळते.
- त्यामुळे त्याला दुर्मिळ फळांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- या फळाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर ते 150 ते 200 रुपये किलोने मिळते.
- त्याची पाने गुजरात आणि राजस्थानमध्ये शेळ्या आणि उंटांसाठी चारा म्हणून वापरली जातात.
- हे फळ गुजरात, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश ,राजस्थान याठिकाणी आढळते.
- लासोड्याचे फळच नाही तर त्याचे लाकूडही खूप उपयुक्त आहे.
- लासोड्याचे लाकूड मजबूत आणि गुळगुळीत असल्यामुळे त्याचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठी होतो.
हेही वाचा : हेल्दी आरोग्यासाठी आक्रोड भिजवून खावेत का?
- Advertisement -
- Advertisement -