घरट्रेंडिंगलैंगिक संबंध ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते मंकीपॉक्सची लागण, वाचा तज्ज्ञ...

लैंगिक संबंध ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते मंकीपॉक्सची लागण, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात?

Subscribe

कोरोनानंतर जगभरात मंकीपॉक्सने थैमान घातले असून, भारतातही हळूहळू पाय पसरत आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढ असल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. जगभरात मंकीपॉक्स वाढता धोका लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघटनेनेही जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.

कोरोनानंतर जगभरात मंकीपॉक्सने थैमान घातले असून, भारतातही हळूहळू पाय पसरत आहे. देशाच्या अनेक शहरांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळत आहेत. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या वाढ असल्याने आरोग्य यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. जगभरात मंकीपॉक्स वाढता धोका लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघटनेनेही जागतिक आणीबाणी घोषित केली आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचा धोका कमी करण्यासाठी अनेक मार्गदर्शक तत्वे देखील जारी केली आहेत. विशेष म्हणजे या मार्गदर्शक तत्वांमध्ये पुरुषांच्या लैंगिक वर्तनाशी संबंधित काही खास सूचना देण्यात आल्या आहेत. (monkeypox virus guidelines on multiple sexual partner symptoms treatment cases in india)

नागरिकांना सुरक्षिततेसाठी खबरदारीचा सल्ला

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण मे महिन्यात आढळला होता. त्यावेळी, यानंतर ९८ टक्के समलैंगिक आणि महिलांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली आहेत. तसेच, नागरिकांना सुरक्षिततेसाठी खबरदारीचा सल्ला दिला आहे. “जे पुरुष पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुरक्षित पर्याय निवडला पाहिजे”, असेही टेड्रोस यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाने स्वत:ला विलगीकरण क्षेत्रात ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सोबतच कोणताही शारीरिक संबंध किंवा नवीन लैंगिक साथीदार बनवणे टाळले पाहिजे.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स हा संसर्गजन्य असल्याने एका बाधित रुग्णाच्या कपड्याच्या किंवा बेडशीटच्या संपर्कात आलेल्या कोणालाही संक्रमित करू शकतो. तसेच, रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्यांमध्येही आणि मुले किंवा गर्भवती महिलांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर मंकीपॉक्सचा प्रसार

दरम्यान, लैंगिक संबंध ठेवल्यानंतर मंकीपॉक्सचा प्रसार अधिक होतो. मात्र याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आला नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार अॅण्डी सील यांनी दिली. तसेच, ‘सेक्सदरम्यान कंडोमचा वापर केल्यास संबंधितांना मंकीपॉक्सच्या संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होणार की नाही याबाबत अस्पष्टता कायम आहे’, असेही अॅण्डी सील यांनी म्हटले.

मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचार करणारे यूकेमधील डॉक्टर ह्यू एडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सचा आजार सेक्समुळे पसरत आहे. अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवणारे मंकीपॉक्सचा धोका अधिक वाढवत आहेत.

सुमारे ९९ टक्के मंकीपॉक्स पुरुषांमध्ये आढळतात

जागतिक आरोग्य संघटनेचे मंकीपॉक्स तज्ज्ञ रोसामुंड लुईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे पुरुष पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात त्यांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. सुमारे ९९ टक्के मंकीपॉक्स पुरुषांमध्ये आढळतात आणि त्यापैकी किमान ९५ टक्के पुरुष आहेत, जे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असेही आढळून आले आहे की संक्रमित लोकांपैकी ९८ टक्के लोक समलिंगी किंवा बायसेक्शूअल होते.

मंकीपॉक्सचा प्रसार कसा होतो

  • प्रामुख्याने सेक्सदरम्यान हा आजार पसरतो
  • शारीरिक संपर्कातूनही या विषाणूची लागण होऊ शकते.
  • संक्रमित व्यक्तीच्या कुटुंबातील एकमेकांना मिठी मारणे आणि चुंबन घेतल्यानेही आजार पसरतो.
  • संक्रमित व्यक्तीचे टॉवेल किंवा बिछाना सामायिक केल्याने देखील हे होऊ शकते.
  • एखादी जखम संक्रमित व्यक्तीच्या तोंडात असेल, तर मंकीपॉक्स लाळेद्वारेही पसरू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे

शरीरात पुरळ उठतात, ज्यामुळे खूप वेदना होतात. पूर्वीच्या प्रकरणांमध्ये, मंकीपॉक्सची सुरुवात फ्लूसारख्या लक्षणांनी होते आणि त्यानंतर पुरळ संपूर्ण शरीरात पसरते. परंतु सध्याच्या उद्रेकात, मंकीपॉक्सची लक्षणे असामान्य आहेत. काही लोकांना आधी पुरळ आणि नंतर फ्लूची लक्षणे दिसतात. तर काहींना फ्लूची कोणतीही लक्षणे नसताना पुरळ उठते. अनेकांना प्रायव्हेट पार्टजवळ पुरळ उठत आहे.


हेही वाचा – ओबीसी आरक्षणाला मंजुरी मिळण्याआधी जाहीर झालेल्या निवडणुका होणार आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -