घरदेश-विदेशपहिल्या दोन तासांत आसाममध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

पहिल्या दोन तासांत आसाममध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Subscribe

महाराष्ट्रात पहिल्या दोन तासांत फक्त ०.८५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर आसाममध्ये सर्वाधिक प्रमाणात मतदान झाल्याची नोंद झाली आहे. आसाममध्ये पहिल्या दोन तासांत ९.१ टक्के मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज देशभरात सुरु आहे. देशात एकूण ९७ जागांसाठी हे मतदान सुरु आहे. आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सात ते नऊ या दोन तासांत आसाममध्ये सर्वाधिक प्रमाणात मतदान झाल्याची नोंद झाली आहे. आसाम राज्याच्या ५ मतदारसंघामध्ये मतदान सुरु आहे. आसाममधील नागरिक मतदानाला चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत आसाममध्ये सर्वाधिक ९.१ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगानी दिली आहे.

आसाम नंतर बिहारच्या नागरिकांनी पहिल्या दोन तासांत सर्वाधिक प्रमाणात मतदान केले आहे. एकूण मतदारांच्या ७.८३ टक्के मतदारांनी पहिल्या दोन तासांत मतदान केले आहे. बिहारच्या आज ३ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तर उत्तर प्रदेशच्या ८ मतदासंघांमध्ये आज मतदान होत आहे. परंतु, पहिल्या दोन तासांत उत्तर प्रदेशमध्ये फक्त ३.९९ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.

- Advertisement -

बिहारनंतर छत्तीसगडचा नंबर लागला आहे. या राज्यात नक्क्षलवादींची संख्या जास्त असूनही येथील नाकगरिकांना निर्भिडपणे मतदानाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगडच्या तीन जागांसाठी हे मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये ७.७५ टक्के मतदान झाले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पहिल्या दोन तासांत फक्त ०.८५ टक्के मतदान झाले आहे. यासोबतच जम्मू आणि काश्मीरमध्ये ०.९९ टक्के, तमिळनाडूमध्ये ०.८१ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ०.५५ टक्के, पांडूचेरीमध्ये १.६२ टक्के, मनीपूरमध्ये १.७८ टक्के, कर्नाटकमध्ये १.१४ टक्के मतदान झाल्याची दोन झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -