घरदेश-विदेशपंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

Subscribe

ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याचे निवडणूक आयोगाने निलंबन केले आहे. मोहम्मद मोहसिन असं या आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून ते कर्नाटकचे १९९६ च्या बँचचे आयएएस अधिकारी आहेत. मोहम्मद मोहसिन यांनी संबलपूर लोकसभा मतदारसंघात मोदी सभेसाठी आले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तपासणी करु दिली नाही. आयएएस अधिकारी मोहसिन यांची संबलपूरमध्ये जनरल ऑब्जर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आयएएस अधिकारी मोहसिन यांचे निलंबन

याप्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तंसच निवडणूक आयोगाचे अधिकारी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी ओडिशाला आले होते. पंतप्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपानंतर आयएएस अधिकारी मोहसिन यांचे निलंबन करण्यात आले. त्यांना निवडणूक आयोगाने एसपीजी सुरक्षाप्राप्त व्यक्तीसाठी बनलेल्या नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन निलंबित केला आहे. एप्रिल २०१४ पासून लागू केलेल्या निर्दशानुसार एसपीडी सुरक्षा प्राप्त व्यक्तिंना तपासणीतून सूट देण्यात आली आहे.

- Advertisement -

मोदींना १५ मिनिटं थांबावे लागले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची अचानक तपासणी करण्यात आल्यामुळे पंतप्रधानांना १५ मिनिटं थांबावे लागले होते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचेही हेलिकॉप्टर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मंगळवारी तपासले होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचेही हेलिकॉप्टर संबलपूरमध्ये मंगळवारी तपासण्यात आले होते.

किरण बेदींवर देखील झाली होती कारवाई

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीवर पहिला महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी कारवाई केली होती. दिल्ली ट्रफिकमध्ये तैनात असलेल्या किरण बेदी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची गाडी क्रेनच्या सहाय्याने उचलून पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्या कारचालकाने गाडी नोपार्किंगमध्ये होती. त्याविरोधात कारवाई करत त्यांनी कारचालकाला दंड भरायला लावला होता मात्र त्याने दंड न भरल्याने गाडी पोलीस स्टेशनला नेण्यात आली होती. या घटनेनंतर इंदिरा गांधी यांच्याविरोधातही कारवाई करत त्यांची बदली करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -