घरदेश-विदेशमाऊंट एव्हरेस्ट शिखराच्या उंचीत इतकी झाली वाढ

माऊंट एव्हरेस्ट शिखराच्या उंचीत इतकी झाली वाढ

Subscribe

अस पडल शिखराला माऊंट एव्हरेस्ट असे नाव

जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळख असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याची माहिती आज जाहीर करण्यात आली. आधीच्या उंचीपेक्षा ८६ सेंटीमीटरने म्हणजे ( जवळपास तीन फुटांनी) वाढल्याची माहिती नेपाळ आणि चीन यांच्यातील एका दीर्घ चर्चेनंतर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे माऊंट एव्हरेस्टच्या उंचीच्या विक्रमात आणखी एका नव्या विक्रमाची भर पडली आहे. जगातले सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्टची जगभरात ओळख आहे. नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनी माऊंट एव्हरेस्टबाबतची अधिकृत माहिती जाहीर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून माऊंट एव्हरेस्टच्या उंचीबाबत नेपाळ आणि चीन यांच्यामध्ये सातत्याने बैठका होत होत्या. पण या प्रदीर्घ बैठकांनंतर अखेर माऊंट एव्हरेस्टची उंची ३ फुटांनी वाढली आली असल्याचे एका संयुक्त निवेदन दोन्ही देशांमार्फत जाहीर करण्यात आले आहे. नेपाळकडून परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली तर चीनकडून वॅंग यी यांनी हे निवेदन जाहीर केले आहे. याआधीच्या उंचीत ८६ सेंटीमीटर इतकी नवी उंचीची भर असल्याचे नव्या तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे आता माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८.८६ मीटर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा एक एतिहासिक दिवस असल्याचे परराष्ट्र मंत्री ग्यावली यांनी जाहीर केले. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावरील बैठकांचे सत्र सुरू होते, अखेर ही बातमी समोर आलीच असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

याआधी माऊंट एव्हरेस्ट या शिखराची उंची १८४७ साली भारतात आलेल्या एका ब्रिटीश सर्वेक्षणकर्त्यांने या शिखराची उंची मोजली होती. याआधीची १८४७ साली मोजलेली उंची ८७७८ इतकी होती. नेपाळ २०११ सालापासून या शिखराची उंची मोजण्याची मोहीम नेपाळणे राबवली होती. माऊंट एव्हरेस्ट शिखराची अधिकृत मोजणी भारतातच १९५४ साली झाली होती. त्यावेळी ८८४८ मीटर म्हणजे २९०२८ फुट इतकी उंची म्हणून या शिखराची नोंद झाली होती. याआधी १८४९ आणि १८५५ दरम्यान सर्वे ऑफ इंडियामध्ये भारतातील देहरादून ते बिहारमधील सोनाखोडा या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी हिमालयातील पर्वतरांगांमध्ये हे सर्वात उंच शिखर असेल अशी कोणालाही माहिती नव्हती. सर जॉर्ज एव्हरेस्ट या भारतातील सर्वेक्षणकर्त्याच्या नावावरूनच या शिखऱाला एव्हरेस्ट असे नाव मिळाले. पण या शिखराची अधिकृत उंची ही ८८४८ मीटर ही १९५४ च्या बिहारमधील ट्रायग्नोमेट्रिक सर्वेक्षणानुसार ग्राह्य मानण्यात आली.


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -