घरक्राइमMP Crime News: नोकरीसाठी 'वन नाइट स्टॅंड'ची अट; पोलिसांनी 'त्या'ची धिंड काढत...

MP Crime News: नोकरीसाठी ‘वन नाइट स्टॅंड’ची अट; पोलिसांनी ‘त्या’ची धिंड काढत दाखवले तारे

Subscribe

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये नोकरीच्या बदल्यात एक रात्र माझ्यासोबत घालवं, अशी मागणी करणाऱ्या बीज महामंडळाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये नोकरीच्या बदल्यात एक रात्र माझ्यासोबत घालवं, अशी मागणी करणाऱ्या बीज महामंडळाच्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींनी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बीज महामंडळाचे अधिकारी संजीव कुमार यांना ग्वाल्हेर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशिरा भोपाळ येथून ताब्यात घेतले. यानंतर त्याला ग्वाल्हेरला रवाना करण्यात आले. (MP Crime News Gwalior One Night Stand condition for employment The police Arrested)

ग्वाल्हेर गुन्हे शाखेचे पथक इतर विद्यार्थ्यांचीही चौकशी करणार आहे. काल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या सूचनेवरून मध्य प्रदेश राज्य बियाणे आणि शेती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार तंतुवे, फील्ड प्रोडक्शन ऑफिसर, कॉर्पोरेशन मुख्यालय, भोपाळ यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

3 जानेवारी रोजी ग्वाल्हेर कृषी विद्यापीठात बीज विकास महामंडळात नोकरीसाठी मुलाखती झाल्या. भोपाळहून ग्वाल्हेरला पोहोचलेले बीज निगम अधिकारी संजीव कुमार यांनी विद्यार्थिनींना मुलाखतीनंतर एक रात्र त्याच्यासोबत राहण्याची, शरीरसुखाची मागणी केली होती. संजीवने दोन विद्यार्थिनींना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्यांना एक रात्र घालवण्यास सांगितले होते. याप्रकरणी रीवा येथील एका विद्यार्थ्याने ग्वाल्हेर गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यावर गुन्हे शाखेने कलम 354A अंतर्गत आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आणि त्याला नोटीस बजावली.

ग्वाल्हेरमध्ये नोकरीच्या नावाखाली विद्यार्थिनींकडून सेक्सची मागणी केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अधिकारी संजीव कुमार याच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. सीड कॉर्पोरेशनच्या महाव्यवस्थापकांनी आरोपी उत्पादन सहाय्यक संजीव कुमार याला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. मध्य प्रदेश बियाणे महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना लाल गोयल यांनी आरोपी अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बियाणे महामंडळाचे अध्यक्ष मुन्नालाल गोयल यांच्या सूचनेनंतर विभागाने या अधिकाऱ्याला बडतर्फ केले होते.

- Advertisement -

(हेही वाचा: Crime : प्रेयसीची हत्या करत स्वत:ला संपवले, मात्र पोलीस अडकले सांकेतिक क्रमांकात )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -