घरदेश-विदेशआशियातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी

आशियातील सर्वात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी

Subscribe

'ब्लूमबर्ग' वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती वाढून आता ४४.३ अब्ज डॉलर झाली आहे. अंबानी यांनी ही संपत्तीतील वाढ रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तेजी आल्यानंतर नोंदवण्यात आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत ‘अलिबाबा’चे संस्थापक जॅक मा यांना त्यांनी पिछाडीवर सोडलं आहे. ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती वाढून आता ४४.३ अब्ज डॉलर झाली आहे. अंबानी यांनी ही संपत्तीतील वाढ रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तेजी आल्यानंतर नोंदवण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर शुक्रवारी १.७ टक्क्यांनी वाढला असून ११०१ रुपयांवर पोहचला आहे.

जॅक मा ची संपत्ती आहे ४४ अब्ज डॉलर

अलीबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती गुरुवारी ४४ अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली होती. एनर्जी सेक्टरपासून ते टेलिकॉम सेक्टरपर्यंत जबरदस्त तेजीनं मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं रिलायन्स जिओमध्येही चांगली कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ४१ व्या एजीएममध्ये मुकेश अंबानीनं पुढील सात वर्षात आपली वाढ दुप्पट करण्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

रिलायन्सचे शेअर्स उच्चांकावर

दरम्यान पहिल्या गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचं शेअर बाजारातील मूल्यांकन हे १०० अब्ज डॉलर अर्थात ६.८८ लाख कोटी इतकं पोहोचलं होतं. गुरुवारी कंपनीचे शेअर्सचे ५२ आठवड्यांनंतर उच्चांकावर पोहोचले होते. शुक्रवारीदेखील कंपनीचे शेअर्स उच्चांकावर होते, त्यामुळं गुंतवणुकदारांना चांगलाच फायदा झाला. आरआयएलच्या शेअर्सच्या तेजीमुळं एप्रिल – जून या तिमाही दरम्यानचे निकाल येण्यापूर्वीच कंपनीनं आपली साधारण वार्षिक सभा घेऊन नया व्यावसायिक योजनांची घोषणा करण्याचा निर्णय घेण्यात येईल असं समजण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -