घरमनोरंजन'हल्का हल्का' गाण्यात ऐश्वर्या-राजकुमारची मजेदार केमिस्ट्री!

‘हल्का हल्का’ गाण्यात ऐश्वर्या-राजकुमारची मजेदार केमिस्ट्री!

Subscribe

'फन्ने खाँ' मधील दुसरं 'हल्का हल्का' गाणं प्रदर्शित झालं असून ऐर्श्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव यांची मजेशीर केमिस्ट्री दिसून येत आहे.

अनेक वर्षांनंतर ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर मोठ्या पडद्यावर एकत्र येत आहे. सध्या ‘फन्ने खाँ’ची सगळीकडेच चर्चा आहे. या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून, ‘हल्का हल्का’ असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात ऐश्वर्या आणि राजकुमार रावची मजेदार केमिस्ट्री दिसत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर प्रेक्षकांना भावलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन या चित्रपटात एका प्रसिद्ध बेबी सिंह नावाच्या रॉकस्टार गायिकेची भूमिका साकारत आहे. राजकुमार रावनं तिचं अपहरण केल्याचं या गाण्यातून दिसत असून यातील त्याच्या भूमिकेचं नाव अधर आहे. या गाण्यात अधर आणि बेबीमधला रोमान्स दिसून येत आहे.

काय आहे गाण्याची खासियत?

‘हल्का हल्का सुरूर है’ हे नुसरत फतेह अली खान यांचं प्रसिद्ध गाणं असून या चित्रपटात अतिशय चांगल्या तऱ्हेनं सामील करून घेण्यात आलं आहे. या गाण्याला अमित त्रिवेदीनं संगीत दिलं असून सुनिधी चौहान आणि दिव्य कुमार यांनी हे गाणं गायलं आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि ऐश्वर्यासह राजकुमार रावचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘फन्ने खाँ’ ची भूमिका अनिल कपूर साकारत असून स्वतः चांगला गायक असूनही काही बनू न शकल्यामुळं आपल्या मुलीला जबरदस्त गायिका बनवण्याचं स्वप्नं पाहणारा बाप आहे. त्याला स्वतःचा अल्बमही रिलीज करायचा आहे. परंतु तो रिक्षाचालक असून मुलीचं स्वप्नं कशा प्रकारे साकारणार याबाबत हा चित्रपट आहे. हा चित्रपट ३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

पहिल्यांदाच ऐश्वर्या आणि राजकुमार एकत्र

पहिल्यांदाच ऐर्श्वया आणि राजकुमार ही जोडी एकत्र दिसत आहे. राजकुमारनं नेहमीप्रमाणेच सहज अभिनय केला असल्याचं या गाण्यावरून लक्षात येत आहे. ऐश्वर्यासारखी अभिनेत्री समोर असूनही कोणतंही दडपण राजकुमारच्या अभिनयात जाणवत नाही. त्यामुळं त्यांची मजेशीर केमिस्ट्री या गाण्यात दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -