घरताज्या घडामोडीअंबानी काही ऐकेनात; ६व्या क्रमांकावरून झाले ५ व्या क्रमांकाचे जगातील श्रीमंत व्यक्ती!

अंबानी काही ऐकेनात; ६व्या क्रमांकावरून झाले ५ व्या क्रमांकाचे जगातील श्रीमंत व्यक्ती!

Subscribe

जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये मुकेश अंबानी सहाव्या क्रमांकावरुन आता पाचव्या क्रमांकावर.

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका अनेक उद्योग आणि व्यावसायांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे एका बाजूला आर्थिक तोटा, बेरोजगारी, पगार कपात आणि कामगार कपातीच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी श्रीमंत व्यक्ती म्हणून चांगलेच चर्चेत आले आहेत.

गेल्या चार महिन्यात मुकेश अंबानी जिओमधील गुंतवणूकीच्या बातम्यांमुळे चर्चेत आले होते. तर आता जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये ते सहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे १४ जुलै रोजी मुकेश अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले होते. तेव्हा त्यांची संपत्त ७२.४ अब्ज डॉलर होती. आता २२ जुलै रोजी ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आठ दिवसात त्यांची संपत्ती २.६ अब्ज डॉलरने वाढली आहे.

- Advertisement -

जगातील श्रीमंतांच्या यादीतील व्यक्ती

जगातील श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आहेत. त्यांची संपत्ती १८५.८ अब्ज डॉलर इतकी आहे. ११३.१ अब्ज डॉलरसह बिल गेट्स दुसऱ्या, ११२ अब्ज डॉलरसह बर्नार्ड अर्नाल्ट अॅण्ड फॅमेली तिसऱ्या स्थानावर तर ८९ अब्ज डॉलर सह फेसबुकचा सहसंस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग चौथ्या स्थानावर आहे. तर आता पाचव्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. तसेच मुकेश अंबानी आणि मार्क झुकरबर्ग यांच्या संपत्तीत १४.४ अब्ज डॉलरचा फरक आहे. अंबानी यांच्यानंतर ७२.७ अब्ज डॉलरसह वॉरेन बफेट सहाव्या क्रमांकावर आहेत. लॅरी एलिसन सातव्या, अॅलन मस्क आठव्या, स्टीव्ह बाल्मर नवव्या तर लॅरी पेज दहाव्या क्रमांकावर आहेत. पेज यांची संपत्ती ६९.४ अब्ज डॉलर इतकी आहे.


हेही वाचा – कोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली – WHO

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -