घरदेश-विदेशकोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली - WHO

कोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली – WHO

Subscribe

'भारतासारखं मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना सारखी परिस्थिती असामान्य नाही'

डब्ल्यूएचओच्या (जागतिक आरोग्य संघटना) दक्षिण पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी म्हटले आहे की, कोविड -१९ बाबत भारत सुरुवातीपासूनच सक्रिय आहे. कोरोना हॉस्पिटल तयार करणे, औषधांची व्यवस्था करणे आणि कोरोना चाचणीची क्षमता वाढविणे यासह भारत आपली तयारी आणि त्याचा वेग सातत्याने विस्तार करीत आहे.

- Advertisement -

डॉ. खेत्रपाल असेही म्हणाले, ‘आम्ही भारतातील राज्यस्तरावर या क्षमतांच्या विविध गोष्टींशी परिचित आहोत. भारतासारखं मोठं क्षेत्रफळ असणाऱ्या आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात कोरोना सारखी परिस्थिती असामान्य नाही. सर्व ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजना बहुधा सगळीकडेच तितक्याच पुरेसे नसतील. क्षमता आणि त्या उपाययोजनांना मिळणारा प्रतिसाद वाढविण्यासाठी भारतात सतत नव्या उपाययोजनांची गरज आहे. ‘

दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत ३७ हजार ७२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६४८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ९२ हजार ९१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २८ हजार ७३२ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५३ हजार ५० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

सध्या देशात ४ लाख ११ हजार १३३ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. २१ जुलै पर्यंत देशात १ कोटी ४७ लाख २४ हजार ५४६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी मंगळवारी ३ लाख ४३ हजार २४३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.


Corona वर मात केल्यानंतर व्यावसायिकाने ऑफिसला बनवले COVID हॉस्पिटल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -