घरCORONA UPDATEchina vs america : 'दूतावास त्वरीत बंद करा'; चीनला अमेरिकेने खडसावले

china vs america : ‘दूतावास त्वरीत बंद करा’; चीनला अमेरिकेने खडसावले

Subscribe

कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वाधिक फटका बलाढ्य राष्ट्र अमेरिकेला बसला आहे. गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका आणि चीनमधील तणावदेखील वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमेरिकेने चीनवर निशाणा साधत त्यांना फर्मान जारी केले आहे. अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्यास सांगितले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेन्बिन यांनी सांगितले की, ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास बंद करण्यासंबंधी चीनला मंगळवारी माहिती देण्यात आली. अमेरिकेने हा चुकीचा निर्णय मागे घ्यावा असा आग्रह चीनने केला आहे. नाहीतर चीनही या निर्णयाविरोधात आवश्यक व योग्य पावले टाकेल, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले वांग वेन्बिन

अमेरिकेकडून एकतर्फी आणि चिथावणीखोर पाऊल टाकले जात आहे. हे एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि द्विपक्षीय कराराचे उल्लंघन आहे. हे चुकीचे पाऊल असून, यामुळे दोन्ही देशातील संबंध बिघडू शकतात. अमेरिकेच्या निर्णयावर चीनकडून टीका करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेने वारंवार चीनवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. चीनमधून कोरोनाचा प्रसार झाला असून त्यांना संपूर्ण जगाला याचे उत्तर द्यावे लागेल, असे या पूर्वी अमेरिकेने अनेकदा म्हटले आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनादेखील चीनला पाठिशी घालत असून अमेरिकेने त्यांची रसदही बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर चीन आणि अमेरिकेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून दोघांमधील वाद चिखळला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोना व्हायरससंदर्भात भारताने वेळीच योग्य ती पावले उचलली – WHO

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -