घरताज्या घडामोडीGujarat case: मुंद्रा पोर्टवर जप्त केलेल्या हेरॉईनचे पाक दहशतवाद्यांशी कनेक्शन; NIAचा मोठा...

Gujarat case: मुंद्रा पोर्टवर जप्त केलेल्या हेरॉईनचे पाक दहशतवाद्यांशी कनेक्शन; NIAचा मोठा खुलासा

Subscribe

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर ३ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आली होती. याचे संबंध पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत जोडलेले असल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणाने (NIA) कोर्टात केला आहे. याप्रकरणी एनआयएनने १६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये ११ अफगाणी नागरिक, ४ भारतीय आणि एक इराणी नागरिकाचा समावेश आहे. महसूल अधिसूचना संचालनालयाने (Directorate of Revenue Intelligence and the consignment) हे हेरॉईन गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जप्त केले होते, ज्याची किंमत २१ हजार कोटी रुपये सांगितली होती.

- Advertisement -

एनआयएच्या माहितीनुसार, या हेरॉईनशी संबंधित मोहम्मद हसन हुसैन दाद आणि मोहम्मद हसन दाद यांचे संबंध पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी जोडले आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हवालातून ही ड्रग्ज तस्करी केली जात होत.

अफगाणिस्तानातील कंधारमधील मेमर्स हसन हुसैन लिमिटेडचे हसन दाद आणि हुसैन दाद मालक आहेत. त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, जी खेप पाठवली होती, त्यामध्ये कच्चा दगड आहे, ज्याने पावडर केली जाते. ही खेप कंधारपासून इराण पोर्टहून भारतात पाठवली होती. भारतात ही खेप आंध्र प्रदेशाच्या आशी ट्रेडिंग कंपनीमध्ये पाठवली जाणार होती. ही कंपनी चेन्नईचे महावरम सुधाकर आणि त्याची पत्नी गोविंद राजू दुर्गापूर्णा वैशाली चालवत होते.

- Advertisement -

पावडरच्या दगडच्या बदल्यात हेरॉईन

एनआयएने कोर्टात सांगितले की, चौकशीतून समजले की, यापूर्वीही भारतात अशाप्रकारे ड्रग्जची तस्करी हे लोकं करत होते. यासंबंधित केस महसूल अधिसूचना संचालनालयामध्ये नोंद केल्या आहेत. दिल्लीच्या वेअरहाऊसहून १६ किलो हेरॉईन जप्त केली होती. याप्रकरणी गढ शंकर ठाण्यात केस दाखल केली होती. अशाप्रकारे पंजबामध्ये २०.२५० ग्रॅम हेरॉईन जप्त केली होती. ही दोन्ही प्रकरण याप्रकरणातील आरोपींशी संबंधित आहेत. आशी ट्रेडिंग कंपनीचे आरोपी एम सुधाकर, डीपी वैशाली आणि इतर काही जण मिळून देशात ड्रग्ज तस्करी करत होते. हे लोकं पावडरचा कच्चा दगड सांगून विकत होते. या लोकांनी भारताविरुद्ध गुन्हेगारी कट रचला.


हेही वाचा – Corona: कोरोनाची दहशत, चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला ५ अब्ज डॉलरचे नुकसान


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -