घरदेश-विदेशइतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील मुसलमानांची परिस्थिती चांगली - मुख्यमंत्री

इतर राज्यांच्या तुलनेत गुजरातमधील मुसलमानांची परिस्थिती चांगली – मुख्यमंत्री

Subscribe

काँग्रस पक्षावर हिंदू - मुसलमानात मतभेद करण्याचे आरोप लावत गुजरातचे मुख्यमंत्री यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशात इतर राज्याच्या तुलनेत गुजरातमधील मुसलमान चांगले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

इतर राज्याच्या तुलने गुजरात राज्यातीत मुसलमानांची स्थिती चांगली असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंगळवारी केला आहे. हिंदू आणि मुसलमान यांच्यात मतभेद निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले असल्याचा आरोप त्यांनी केले. “वोट फॉर राजनिती” हे सत्र संपले पाहिजे. रुपाणी हे वक्फ बोर्ड येथील कार्यालयाच्या उदघाटना दरम्यान त्यांनी हे उदगार काढले. भाजप सरकारच्या काळात मुस्लिमांची परिस्थीती राज्यात चांगली असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. आपल्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ६६६ कोटी रुपयांचा निधी विविध योजनांसाठी घोषीत केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले रुपाणी

“राजकीय फायद्यासाठी हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडन लावण्याचे काम काँग्रेस पक्षाने केले आहे. याचा फायदा नेहेमीच काँग्रेस उचलत आला आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यात कोणत्याही प्रकारच्या जातीय दंगली झाल्या नाहीत. काँग्रेसच्या शासनात अशा प्रकारचे प्रकार घडत होते.” – गुजरात, मुख्यमंत्री विजय रुपाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -