घरताज्या घडामोडीमंगळावर सापडला रहस्यमय दरवाजा, नासाच्या शास्त्रज्ञांचा शोध

मंगळावर सापडला रहस्यमय दरवाजा, नासाच्या शास्त्रज्ञांचा शोध

Subscribe

अवकाश अनेक रहस्यांनी दडलेले आहे. नासा आणि इतर अवकाश संशोधन करणाऱ्या संस्था आणि शास्त्रज्ञ अनेक नवीन शोध घेण्यासाठी संशोधन करत असतात. याचं संशोधनामधून आतापर्यंत अनेक शोध लावण्यात आले आहेत. सूत्रांच्या मते, नासाला मंगळावर काहीतरी विचित्र आढळलं आहे. नासाच्या क्सुरिऑसिटी रोव्हरला मंगळावरील दगडामध्ये चौकोनी एक मार्ग दिसला आहे. या मार्गातून दुसरा मार्ग असल्याचा अंदाज लावला जात आहे. दगडात बनवलेल्या या दगडी दरवाजाच्या आत काय आहे हे अजून कळू शकलेले नाही.

नासा शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे फोटो पाहिल्यानंतर सुरूवातीला त्यांना वाटले की हा चौकोनी मार्ग म्हणजे मंगळाच्या मध्यभागी जाण्याचा दरवाजा किंवा एलियनच्या घराचा दरवाजा असू शकतो. मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते असा अंदाज लावला जात आहे की, मंगळावरील भूकंपामुळे दगड तुटल्याने हा एक आकार तयार झाला आहे. ४ मे रोजी मंगळ ग्रहावर सर्वात भयानक भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

नासाने शेअर केलेले फोटो पाहून काही शास्त्रज्ञ म्हणतात की, हा दगडाच्या मध्यभागी तयार केलेला खड्डा असून तो लाल मातीने भरलेला आहे, मंगळावरील भूकंपामुळे दगडाचे तुकडे झाले आणि त्यामुळेच तो मार्ग दिसू लागला. या सापडलेल्या दरवाज्याला शास्त्रज्ञांनी ग्रीनह्यू पेडिमेंट म्हटलं आहे.

- Advertisement -

अंतराळात कोणतीही वेगळी गोष्ट सापडल्यास त्या गोष्टीचा संबंध एलियन्ससोबत जोडला जातो. मात्र नासाने या फोटोंबाबत म्हटले आहे की, आपण अशा कथांपासून दूर रहायला हवे.


हेही वाचा :भाजपने सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले, सचिन सावंतांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -