घरदेश-विदेशSanjay Raut : संसद भवनातील घुसखोरीवरून संजय राऊतांची सरकारवर टीका, नवीन संसदभवन…

Sanjay Raut : संसद भवनातील घुसखोरीवरून संजय राऊतांची सरकारवर टीका, नवीन संसदभवन…

Subscribe

दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान काल (ता.13 डिसेंबर) धक्कादायक घटना घडली. दोन तरूणांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृता उड्या मारल्या. त्याचप्रमाणे तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत गोंधळ घातला. त्यानंतर या तरूणांना ताब्यात घेण्यात आले. संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या तरूणांमध्ये एक तरुणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. अमोल शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे.

काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत गोंधळ उडाला, यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकणावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

नवी संसद भवन माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. जूनी संसद अधिक सुरक्षित होती. संसदेत जाताना एक फिल यावा लागतो तो फिल नविन संसद भवन मध्ये येत नाही. जुन्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू बसलेले दिसत होते. इथं तस काही दिसत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संसदेत काल तरूणांनी गॅलेरीतून उड्या मारल्या. कोणत्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठंही जाऊ शकतं हे काल दिसलं. ज्या तरुणांना पकडलं. त्यांचा मार्ग चुकीचा… त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवार यांना लगावला. काल जे झालं ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. या तरुणांकडून झालेला अतिरेक देशासाठी घातक आहे. त्यांचं समर्थन आजिबात नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

- Advertisement -

देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. सीमा, सीमावर्ती राज्य, लोक आणि आता काल संसद… सरकारची आता वाचा गेली आहे. सरकार मुक आणि बधीर झालं आहे. सरकार निवडणूक प्रचार आणि शपथविधी यात व्यस्त आहे. जनतेला समजलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभं आहे. जनतेला समजलं असेल जम्मू काश्मीर, लढाख, म्यानमारमध्ये अतिरेकी कसे घुसतात, असं देखील राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -