घरदेश-विदेशBJP’s CM : 'अशा' प्रकारे केली जाते भाजपाच्या मुख्यमंत्र्याची निवड, नड्डांनी दिली...

BJP’s CM : ‘अशा’ प्रकारे केली जाते भाजपाच्या मुख्यमंत्र्याची निवड, नड्डांनी दिली माहिती

Subscribe

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव आणि छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांचा शपथविधी सोहळा नुकताच झाला आहे. तर, राजस्थानमध्येही प्रथमच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. आधी विधानसभा निवडणुकीच्या निकालात बाजी मारून आणि नंतर मुख्यमंत्रीपदासाठी नवे चेहरे देऊन भाजपाने सर्वांनाच धक्का दिला. पण आता मुख्यमंत्री निवड प्रक्रियेबाबत भाजपानेच खुलासा केला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एखाद्याच्या नावावर कसे शिक्कामोर्तब केले जाते, याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी दिली आहे.

हेही वाचा – BJP’s CM : भाजपाचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र हेच…, ठाकरे गटाची खोचक टिप्पणी

- Advertisement -

एका कार्यक्रमादरम्यान जे. पी नड्डा यांनी मुख्यमंत्रीपदा संदर्भात पक्षाकडून करण्यात येणाऱ्या सखोल अभ्यासाबाबतच सांगितले. विशेष म्हणजे, या काळात पक्षातील बड्या नेत्यांबरोबरच भाजपाकडून तळागाळातील कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवले जाते. सर्व कार्यकर्त्यांची कामे, त्यांचा इतिहास, त्यांची कार्यशैली तसेच त्यांच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियांवर भाजपाकडून बारकाईने लक्ष ठेवले जाते. याशिवाय, आमच्याकडे खूप मोठी डेटा बँक आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी अभ्यास करत असतो, असे नड्डा म्हणाले.

कधी सुरू होते निवड प्रक्रिया?

निवडणुकीची तारीख जाहीर होताच ही प्रक्रिया सुरू केली जाते आणि त्याबरोबर तिकीट वाटपही केले जाते. विरोधात बसायला लागले तर किंवा सत्ता मिळवली तर पक्षासाठी कोण चांगला नेता असेल, याचा विचार केला जातो. तेव्हापासूनच ही प्रक्रिया सुरूच राहते आणि निवडणुकीच्या निकालानंतर ते अधिक गतीमान होते. बारकाईने विचारविमर्श केला जातो. मंत्रिमंडळ निवडीबाबतीतही अशीच प्रक्रिया अवलंबिली जाते, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – BJP & Congress : काँग्रेसने ‘या’ घडामोडींकडे डोळसपणे पाहण्याची गरज, ठाकरे गटाचा सल्ला

तीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीचे निकष

विष्णूदेव साय, मोहन यादव आणि भजनलाल शर्मा यांना अनुक्रमे छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निकषांबाबतही नड्डा यांनी माहिती दिली. विष्णूदेव साय खूप अनुभवी आहेत. छत्तीसगडमधील कोणत्याही आदिवासी नेत्याला प्रोत्साहन देण्याचे धाडस आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने दाखवले नव्हते, ते भाजपाने केले आहे, असे सांगून मध्य प्रदेशबाबत नड्डा म्हणाले. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ हे आमचे तत्व आहे आणि ते आम्ही अंमलातही आणतो. मोहन यादव हे मोठ्या समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना संधी देण्यात आली. तर, भजनलाल शर्मा हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अशा प्रकारे पक्षाचे कार्यकर्ते देखील मुख्यमंत्री होऊ शकतात, हे भाजपा कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Parliament Security Breach : व्यवस्थेला कोण आणि कशी शिक्षा करणार? आव्हाडांचा सवाल

‘त्या’ नेत्यांचे काय होणार?

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तर आता माजी मुख्यमंत्र्यांच्या भवितव्याबाबतही तर्कवितर्क करण्यास सुरुवात झाली आहे. ते नाराज असल्याची चर्चा फेटाळत, तीन माजी मुख्यमंत्र्यांना, पक्षातील त्यांच्या स्थानानुसार भविष्यात जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे नड्डा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Ajit Pawar : “पीएचडी करून काय दिवे लावणार?”, मनसेचा अजित पवारांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -