घरदेश-विदेशNew Drishyam : छत्तीसगडमधील बेपत्ता अँकरचा मृतदेह नव्या रस्त्याखाली दफन?

New Drishyam : छत्तीसगडमधील बेपत्ता अँकरचा मृतदेह नव्या रस्त्याखाली दफन?

Subscribe

नवी दिल्ली : ‘दृश्यम’ (New Drishyam) चित्रपटासारख्या एका हत्येची कथा छत्तीसगडमध्ये घडल्यांची चर्चा सुरू आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीत काम करणारी सलमा सुल्ताना (Salma Sultana) ही अँकर जवळपास पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाली. आतापर्यंत तिचा ठावठिकाणा लागलेला नाही. पण आता पोलिसांना तिच्या कथित सांगाड्याची (The skeleton) माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचली तेव्हा तेथे चौपदरी रस्ता (Four lane road) तयार करण्यात आला होता. दृश्यम चित्रपटाप्रमाणे रस्ता तयार होण्यापूर्वी मृतदेह दफन करण्यात आला होता का? यादृष्टीने तपास सुरू आहे. सध्या या रस्त्याच्या आजूबाजूचे खोदकाम करण्याबरोबरच स्क्रीनिंगद्वारे सांगाडा शोधण्यात येत आहे.

सन 2018मध्ये कुसमुंडा परिसरात राहणारी आणि ट्रान्सपोर्ट नगरस्थित एका टीव्ही चॅनलमध्ये काम करणारी 18 वर्षीय अँकर सलमा सुलताना अचानक बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसांकडे नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र सलमाचा ठावठिकाणा लागला नाही. यानंतर तपास थंड बस्त्यात ठेवण्यात आला. आता जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक आले आणि त्यांनी बेपत्ता लोकांच्या जुन्या फायली उघडण्याचे आदेश दिले. त्याच अनुषंगाने पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याने सलमाचा मृतदेह कोहाडिया परिसरात पुरला ​​असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

या संशयिताने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, मात्र तेथे चौपदरी रस्ता तयार करण्यात आला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिणामी पोलिसांना सांगाडा शोधण्यात अडचणी येत आहेत. यासाठी रायपूरहून विशेष पथक मागवण्यात आले आहे. हे पथक गेल्या सुमारे चार दिवसांपासून रस्त्याच्या भोवती जेसीबीने खोदकाम करून सांगाडा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच जमिनीची स्क्रीनिंगही करण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत तरी हाती काहीच लागलेले नाही. पोलिसांनी आता सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाच्या इंजिनिअर्सकडून जुना नकाशा आणि रस्त्याचा डायग्राम मागितला असल्याचे सांगितले जाते.

जिम ट्रेनरवर खुनाचा आरोप, पण तोही फरार
सलमाचा कथित खून होण्याची घटना एका जिमशी निगडीत असल्याचे सांगण्यात येते. तीन मित्रांनी मिळून प्रत्येकी 10 लाख रुपयांचे कर्ज घेऊन जिम सुरू केली. यात सलमाही जात असे. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, पण नंतर भागीदारांमध्ये वाद झाला. पोलिसांनी या जिमच्या एका भाीदाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सलमाच्या खुनाची माहिती दिली. जिम ट्रेनरने सलमाची हत्या करून मृतदेह पुरल्याचा आरोप त्याने केला. यानंतर पोलिसांनी जिम ट्रेनरच्या घरावर छापा टाकला, मात्र तो फरार झाला. तथापि त्याची कार जप्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -