घरताज्या घडामोडीमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. कुलकर्णी, तर पुणे विद्यापीठाचे डॉ. गोसावी

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. कुलकर्णी, तर पुणे विद्यापीठाचे डॉ. गोसावी

Subscribe

डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. तसेच डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत. तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे अॅग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.

- Advertisement -

रवींद्र कुलकर्णी हे मुंबईतील माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक आणि विभागप्रमुख कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या काळात डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कारभार सांभाळलेला आहे. त्यामुळे डॉ. रवींद्र कुलकर्णी हे कुलगुरू निवडीच्या शर्यतीत इतरांपेक्षा सरस मानले जात होते.

- Advertisement -

डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.


हेही वाचा : Koregaon Bhima : ‘या’ प्रकरणी साक्षीसाठी फडणवीसांनाही बोलवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -