घरताज्या घडामोडीभारतासारख्या देशात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, उपायोजना करा - WHO च्या मुख्य...

भारतासारख्या देशात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, उपायोजना करा – WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचा सल्ला

Subscribe

जगभरात ओमीक्रॉनबरोबरच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. भारतातही ओमीक्रॉन आणि कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावत असल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला आहे. पण केवळ नाईट कर्फ्यू लावल्याने कोरोना नियंत्रणात येणार नाही तर विज्ञानाच्या आधारावर सरकारने उपाययोजना कराव्यात असा सल्ला WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी दिला आहे.

डिसेंबर पासून भारतात ओमीक्रॉनबरोबरच कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातही दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ओमीक्रॉन रुग्ण असून महाराष्ट्रात दिवसाला दहा हजार कोरोना रुग्ण आढळत असून तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्यांना कोवीड नियमावली पाठवली आहे. त्यानुसार महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पण या नाईट कर्फ्यूवरून आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. कारण अद्यापही राज्यांमध्ये सामान्य वाहतूक सेवा नियमित सुरू असून बाजारात, मार्केटमध्ये दिवसभर नागरिकांचा राबता असतो. यामुळे कोरोनाचा संसर्ग हा गर्दीतून अधिक होतो. मग अशावेळी नाईट कर्फ्यू लागू करून कोरोनावर कसं काय नियंत्रण मिळवता येणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. स्वामीनाथन यांनीदेखील एका वृत्त वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये नाईट कर्फ्यू लावून काहीच होणार नाही. कारण त्यासाठी वैज्ञानिक आधार नाही. यामुळे भारतासारख्या देशांनी विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक आधारांवर धोरणं ठेवायला हवीत असे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. तसेच जाहीर कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसारासाठी कारणीभूत ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले असून अशा ठिकाणांवर निर्बंध टाकणे गरजेचे असून भारतीयांनी घाबरुन न जाता सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -