घरताज्या घडामोडीMrunal Thakul: 'जर्सी' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर Covid-19 Positive, पोस्ट लिहीत दिली...

Mrunal Thakul: ‘जर्सी’ फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर Covid-19 Positive, पोस्ट लिहीत दिली माहिती

Subscribe

शनिवारी कोरोना चाचणी केली असता तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मृणालला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मृणाल सध्या होम क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.

बॉलिवूडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नोरा फतेहीनंतर आता जर्सी (Jersey) फेम अभिनेत्री मृणाल ठाकूरला (Mrunal Thakul)  देखील कोरोनाची लागण झाली आहे. (Mrunal Thakur Covid-19 Positive) मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. मृणालला थोडा थकवा जाणवल्याने तिने शनिवारी कोरोना चाचणी केली असता तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मृणालला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. मृणाल सध्या होम क्वारंटाइन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत.

मृणाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने इन्स्टा स्टोरी शेअर करत ही माहिती दिली. मृणालने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत मात्र मी ठीक आहे. मी माझ्या डॉक्टारांच्या म्हणण्यानुसार उपचार घेत असून त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करत असल्याची’ माहिती मृणालने दिली आहे. त्याचप्रमाणे मृणालने तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे विनंती देखील केली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचे सर्व नियम पाळा, मास्क घाला आणि सुरक्षित रहा असे आवाहन देखील मृणालने तिच्या चाहत्यांना केले आहे.

- Advertisement -

मृणालचा जर्सी हा सिनेमा डिसेंबर २०२१मध्ये रिलीज होणार होता मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सिनेमा रिलीजपासून अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकाने सोशल मीडियावरुन ही माहिती प्रेक्षकांना दिली. ३१ डिसेंबरला सिनेमा रिलीज होणार होता. ज्यात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत आहेत.

- Advertisement -

अभिनेत्री नोरा फतेही आणि शिल्पा शिरोडकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. दोघींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. नोराची तब्येत या काळात फारच बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. तर शिल्पाचे लसीकरण पूर्ण झाले मात्र तरीही तिला कोरोनाची लागण झाली आहे. करिना कपूरनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नवीन वर्षात बॉलिवूड पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात आले आहे असे म्हणावे लागेल.


हेही वाचा – अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नोरा फतेही कोरोना पॉझिटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -