घरदेश-विदेशNirmala Sitharaman : "तुम्ही स्वप्नं दाखवत राहिलात, परंतु आम्ही..."; अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर केला...

Nirmala Sitharaman : “तुम्ही स्वप्नं दाखवत राहिलात, परंतु आम्ही…”; अर्थमंत्र्यांनी विरोधकांवर केला हल्लाबोल

Subscribe

Nirmala Sitharaman : जगभरातले देश आर्थिक संकटातून जात असतानाही भारताची अर्थव्यवस्था मजबुतीने उभी आहे, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी देशातली वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेवरील प्रश्नावर लोकसभेत उत्तर देताना विरोधकांवर हल्लाबोल केला. त्या आज (10 ऑगस्ट) लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलत होत्या. (Nirmala Sitharaman You keep dreaming but we The finance minister attacked the opposition)

हेही वाचा – सर्वत्र भयाच्या अदृश्य पोलादी भिंतीत गुदमरल्याची भावना, ठाकरे गटाची भाजपावर टीका

- Advertisement -

निर्मला सीतारमन म्हणाल्या की, जगभरातली वाढती महागाई आणि घसरलेला विकास दर चिंतेचा विषय ठरत आहे. यावेळी त्यांनी परदेशात काय चाललंय याविषयी माहिती देताना म्हटले की, 2022 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था केवळ 3 टक्क्यांवर गेली आहे आणि जागतिक बँकेच्या मते 2023 मध्ये जागतिक विकास दर 2.1 टक्क्यांपर्यंत अजून खाली जाणार आहे. सध्या ब्रिटनमधली परिस्थिती सर्वात बिकट असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. सीतारामन म्हणाल्या की, तुम्ही आश्वासनं देण्यात दंग राहिलात आणि आम्ही काम करण्यात व्यस्त राहिल्यामुळे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं चित्र बदललं आहे.

- Advertisement -

चीन, ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरली

जगभरातली परिस्थिती बिकट आहे, हे सांगतानाच निर्मला सीतारमन म्हणाल्या की, चीन ही एक मोठी आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे मी चीनच्या अर्थव्यवस्थेशी आपली तुलना करणार नाही. परंतु हे सांगण्याचं कारण असं की, ज्या अर्थव्यवस्था आतापर्यंत मजबूत मानल्या जात होत्या, त्या आज ग्राहकांच्या कमतरतेशी झगडताना दिसत आहेत. चीन, ब्रिटन पाठोपाठ अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरली असल्यामुळे त्याठिकाणी शेअर बाजार घसरला आहे. ही सर्व परिस्थिती पाहून विरोधकांनी आता भारताची अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे, असे सीतारामन म्हणाल्या.

हेही वाचा – सर्वत्र भयाच्या अदृश्य पोलादी भिंतीत गुदमरल्याची भावना, ठाकरे गटाची भाजपावर टीका

आपला देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था

सीतारामन म्हणाल्या की, 2013 मध्ये मॉर्गन आणि स्टॅन्ले यांनी भारताला सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थेंच्या यादीत समाविष्ट केलं होतं. पण आता त्याच मॉर्गन स्टॅन्ले यांनी भारताला अव्वल स्थानी ठेवलं आहे. कारण आज आपला देश सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. हे यासाठी शक्य झालं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं आर्थिक धोरण इतकं सुधारलं आहे की, कोव्हिडसारख्या संकटावर मात करून आपण नव्या ताकदीने उभे राहिलो आहोत आणि पुढे जात आहोत, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.

तुम्ही स्वप्न दाखवत राहिलात, आम्ही जनतेची स्वप्न साकार केली

निर्मला सीतारमन म्हणाल्या की, ‘जन धन योजना’, ‘डिजिटल इंडिया मिशन’, ‘आयुष्मान भारत’, ‘जन औषधी केंद्र’, अशा योजनांचा सर्वांना फायदा झाला आहे. गेली सहा दशके आपण ‘गरिबी हटाओ’ असा नारा ऐकत होतो, पण तसं झालं का? परंतु, आता आपण गरिबी दूर केल्याचं चित्र तुम्ही पाहत आहात. पूर्वी आपण फक्त बनवू, उभारू, तयार करू अशा घोषणा ऐकायचो, पण आता बनवलं, उभारलं, तयार केलं असं ऐकत आहोत. पूर्वी वीज मिळेल, पीएम आवास योजनअंर्गत घर बांधून मिळेल, रस्ता बांधू, विमानतळ बांधू, स्वस्त रेशन मिळेल, पण आता लोक म्हणत आहेत, वीज मिळाली, घरं बांधून मिळाली, रस्ते बांधले, विमानतळं बांधली, स्वस्त रेशन मिळालं. हे सर्व यामुळे शक्य झालं कारण, तुम्ही फक्त स्वप्न दाखवत राहिलात आणि आम्ही जनतेची स्वप्न साकार करत आहोत, असे म्हणत निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या कामाची एकप्रकारे माहितीच दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -