घरCORONA UPDATEयेत्या १० दिवसांत देशात प्रवासी वाहतूक सुरू होणार - नितीन गडकरी

येत्या १० दिवसांत देशात प्रवासी वाहतूक सुरू होणार – नितीन गडकरी

Subscribe

गेल्या दीड महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून देशात प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. रेल्वे, रस्ते, जलमार्ग किंवा हवाई मार्ग अशा कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची पंचाईत झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासियांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार येत्या १० दिवसांत देशात प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. मात्र, ही प्रवासी वाहतूक नक्की कोणत्या प्रकारची असेल, हवाई, रेल्वे, रस्ते, जलमार्ग याविषयी मात्र त्यांनी काही सांगितलं नाही.

नियम-अटींवर विचार-विनिमय सुरू!

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘देशात सध्या अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. त्याद्वारे वेगवेगळ्या भागांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. मात्र, प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. ती लवकरात लवर सुरू करण्याचा प्रयत्न सरकार करत असून त्यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे. मला खात्री आहे, की येत्या १० दिवसांमध्ये देशात प्रवासी वाहतूक सुरू होईल. पण तिच्यासाठी काय नियम किंवा अटी घातल्या जाव्यात, कोणत्या सूचना असतील, कशा प्रकारे ही वाहतूक सुरू करता येईल, याविषयी अद्याप विचार सुरू आहे’, असं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत अडकले आहेत. त्यामध्ये खास मजुरांना त्यांच्या गावी परत जाता यावं, यासाठी श्रमिक ट्रेन सोडल्या जात आहेत. मात्र, इतर कोणत्याही प्रकारच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -