घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: रशियाला दहशतवादी देश म्हणत युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले, 'आम्हाला कोणी...

Russia Ukraine War: रशियाला दहशतवादी देश म्हणत युक्रेनचे राष्ट्रपती म्हणाले, ‘आम्हाला कोणी तोडू शकत नाही’

Subscribe

रशियन सैनिकांनी युक्रेनचे दुसरे मोठे शहर खारकिवमध्ये सोमवारीपासून बॉम्बहल्ला करण्यास सुरुवात केली आहे. खारकिवमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यानंतर युरोपियन संसदेतील भाषणात युक्रेनच्या राष्ट्रपतींनी रशिया दहशतवादी देश असून खारकिवमधील हल्ला हा वॉर क्राईम असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘आम्हाला कोणी तोडू शकत नाही,’ असे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की म्हणाले.

- Advertisement -

युरोपियन संसदेतील झेलेंस्की यांच्या भाषणानंतर सदस्यांनी त्यांना स्टॅडिंग ओवेशन दिले. राष्ट्रपती झेलेंस्की म्हणाले की, ‘आम्ही आमच्या भूमीसाठी आणि आमच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. आम्हाला कोणी तोडू शकत नाही, आम्ही मजबूत आहोत आणि आम्ही युक्रेनियन आहोत. आम्ही आपल्या जमिनीसाठी लढत राहू.’

पुढे झेलेंस्की म्हणाले की, ‘खारकिवमध्ये झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला आहे. रशिया दहशतवादी देश आहे. रशियाने सर्वसामान्यांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. क्रूझ क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. सोमवारी रशियाने १६ मुलांची हत्या केली. युरोपियन युनियनने आमच्यासोबत असल्याचे सिद्ध करावे.’

- Advertisement -

खारकिव विभाग प्रशासनाचे प्रमुख आलेहे सिनेहुबोव म्हणाले की, ‘रशियाने खारकिव येथे मध्यभागी असलेल्या रहिवाशी इमारतींसह एका प्रशासकीय इमारतीवर मंगळवारी गोळीबार केला. दरम्यान युक्रेनचे सैन्य १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात येत असलेल्या रशियन सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे.’


हेही वाचा – Russia Ukraine War: युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात मृत्यू झालेला भारतीय विद्यार्थी कोण आहे?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -