घरक्रीडाVideo : गोलनंतरही रशियन खेळाडूने टाळले सेलिब्रेशन

Video : गोलनंतरही रशियन खेळाडूने टाळले सेलिब्रेशन

Subscribe

अटलांटाचा रूसी फुटबॉलर एलेक्सेइ मिरांचुकने सैंपडोरियावर ४-० अशा फरकाने विजय मिळवणारा गोल केल्यानंतरही मान खालीच ठेवली अन् कोणतेही सेलिब्रेशन केले नाही. रूसच्या राष्ट्रीय टीमला फीफा विश्वचषकात क्वालीफाइंग सामना खेळण्यापासून रोखण्यात आले आहे. युक्रेनवर सैन्याचा हल्ला केल्यामुळे खेळ जगतात रशिया वेगळा पडताना दिसत आहे. मिरांचुकने चार डिफेन्डर्सना चुकवत एक शानदार गोल केला. पण गोल केल्यावर लगेचच संकेत दिले की कोणतेही सेलिब्रेशन होणार नाही.

- Advertisement -

मिरांचुक हा अटलांटा टीमच्या यूक्रेनच्या रूस्लान मालिनोवस्कीचा मित्र आहे. रूस्लानने यूरोप लीगमध्ये गुरूवारी ओलंपियाकोसच्या विरोधात गोल करत आपली जर्सी उतरवली होती. तसेच टीशर्टवर लिहिले होते नो वार इ यूक्रेन.

मिरांचुकने गोल केल्यावर हात वर करत सांगितले की कोणतेही सेलिब्रेशन मी करणार नाही. त्यामुळेच गोल केल्यावरही तो मान खाली करून उभा असलेला दिसला. गोल केल्याचे समाधान त्याच्या नजरेत होते. पण त्याने हात वर करत मान खाली घातली. त्यामुळे एकुणच पुरेसे संकेत त्याने दिले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -