घरताज्या घडामोडीआता रेशन धान्यांच्या पाकीटांवरही पंतप्रधानांचा फोटो

आता रेशन धान्यांच्या पाकीटांवरही पंतप्रधानांचा फोटो

Subscribe

नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे

देशात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतंर्गत गरिबांना पाच किलो मोफत धान्य पुरवले जात आहे. मात्र आता गरिबांना पुरवण्यात येणाऱ्या रेशनच्या अन्न धान्यांच्या पिशव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणार आहे. भाजप शासित राज्यांत मोफत दिल्या जाणाऱ्या धान्यावर मोदीं आणि त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गरिबांना रेशनमध्ये मिळणाऱ्या धान्यांच्या पिशव्यांवर भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचा फोटो देखील छापण्यात येणार आहे. भाजपचे महासचिव अरुण सिंह यांच्याकडे भाजपशासित राज्यांना निर्देश देणारे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. यासाठी ११ सूत्री कार्यक्रमाची आखण्यात आली असून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा जोरदार प्रचार करण्याचे निर्देश पत्रात देण्यात आले आहेत. (Now photo of the Prime Minister Narendra Modi on ration grain bags)

नोव्हेंबर २०२१ पर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. गैरभाजप शासित राज्यातही भाजपकडून गरिबांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. या धान्यांच्या पाकिटावरही भाजपचे चिन्ह असणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून याचा प्रचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात बॅनर देखील लावण्यात येणार असून या बॅनरवर मुख्यमंत्र्यांऐवजी तिथल्या स्थानिक भाजपच्या नेत्याचा फोटो लावण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. तर दुसरीकडे छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये काही गैर भाजपशासित राज्यात लसीकरण सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो काढून मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्यात आलाय.


हेही वाचा – Vaccine: लसीचे दोन डोस घेतल्याने कोरोनापासून ९८ टक्के बचाव – केंद्राची माहिती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -