घरलाईफस्टाईलरोज अंघोळ करण्याचे आहेत 'हे' साईड इफेक्टस

रोज अंघोळ करण्याचे आहेत ‘हे’ साईड इफेक्टस

Subscribe

संशोधनात आढळून आले आहे की दररोज अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी नूकसानदायक ठरू शकते.

लहानपणा पासून प्रत्येक व्यत्तीला शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच निरोगी राहण्याकरीता अंघोळ करणे किती गरजेचे आहे असं सांगण्यात येते. मोठी माणसे नेहमीच आपल्याला अंघोळ केल्याने व्यक्तीच्या शरीरातील रोग,आळस दूर होतो याचे महत्व वारंंवार पटवून देतात. परंतू एका संशोधनात आढळून आले आहे की दररोज अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी नूकसानदायक ठरू शकते. हारवर्ड होल्थच्या एका रिपोर्टनूसार साधरणत: आपल्या शरीराच्या त्वचेवरील तेलकट थर हे गुड बॅक्टेरिया यांना संतुलित ठेवण्याचे काम करते. अंघोळ करतांना आपल्या त्वचेला रगडल्याने किंवा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्याने तेलकट थर निघून जातो तसेच अंघोळ करताना गरम पाण्याचा वापर केल्यास  जास्त नुकसानदायक ठरु शकते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार अंधोळ केल्यानंतर आपली त्वचा रुक्ष तसेच कोरडी पडू लागते यामुळे बाहेरिल बॅक्टेरिया,ॲलेर्जिस ,स्किन इंन्फेक्शन यासारख्या संकटांना  प्रत्येक व्यक्ती निमंत्रण देत असतो. म्हणूनच डॉक्टर अंघोळीनंतर मॉइश्चराईजर, वॅसलिन लावण्याचा सल्ला देतात.

- Advertisement -

शरीरात अँन्टीबॉडीज,इम्यूनिटी वाढण्यासाठी आपल्या शरीरातील प्रतिरक्षा तंत्राला निश्चित स्वरुपात कॉमन बॅक्टेरिया,अस्वच्छता, सूक्ष्म जिवांची आवशक्यता भासते. याच कारणांमुळे डर्मटॉलॉजिस्ट डॉक्टर लहान मुलांना दररोज अंघोळ करण्याचा सल्ला देत नाहीत. वारंवार अंघोळ केल्याने आपल्या शरीराच्या इम्यून सिस्टमची क्षमता कमी होते. आपण वापरत असणाऱ्या अँन्टी बॅक्टेरियल शॅम्पू,साबणामध्ये असणारे केमिकल्स आपल्या शरीरावरील गुड बॅक्टेरियाला मारु शकातात. तसेच त्वचेवरील बॅक्टेरियाचे संतूलन खराब करु शकते. अमेरिकेमधील प्रसिद्ध डर्मटॉलॉजिस्ट डॉ.लॉरेन प्लॉच यांच्या म्हणण्यानुसार त्वचेच्या समस्येशी लढणाऱ्या लोकांनी तसेच जास्त ड्राय स्किन असणाऱ्या व्यक्तींनी जास्तीत जास्त 5 मिनींट अंघोळ करायला हवी. अशा लोकांनी एकावेळेस 1मिंनाटपेक्षा जास्तवेळ शॉवरच्या खाली ऊभे राहणे धोकादायक ठरू शकते याचा परिणाम स्किन आणि केसांवर होण्याची दाट शक्याता आहे.



हे हि वाचा – व्हाईट ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -