घरक्रीडाIND vs ENG : पुजाराला डच्चू देऊन पृथ्वी शॉला संधी द्या; माजी...

IND vs ENG : पुजाराला डच्चू देऊन पृथ्वी शॉला संधी द्या; माजी क्रिकेटपटूचा अजब सल्ला

Subscribe

पुजाराला मागील ३५ डावांमध्ये शतक करता आलेले नाही.

भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराबाबत मागील काही काळात बरीच चर्चा होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुजाराला दोन डावांत मिळून केवळ २३ धावा (८ आणि १५) करता आल्या. त्याने या धावा करण्यासाठी १३४ चेंडू (५४ आणि ८०) खेळून काढले. त्याने सावध पद्धतीने आणि संथ गतीने केलेल्या फलंदाजीसाठी त्याच्यावर टीका झाली. त्यातच त्याला मागील ३५ डावांमध्ये शतक करता आले नसल्याने त्याचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने भारतीय संघाला अजब सल्ला दिला आहे. भारताने पुजाराच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी शॉला संधी दिली पाहिजे असे हॉगला वाटते.

पृथ्वीचे भविष्य उज्ज्वल

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी पुजाराची जागा लोकेश राहुलने घेतली पाहिजे का? असा प्रश्न एका चाहत्याने हॉगला विचारला. याचे उत्तर देताना हॉग म्हणाला, पुजाराची जागा जर कोणी घेणार असेल तर तो पृथ्वी शॉ असला पाहिजे. सलामीला खेळण्यापेक्षा पृथ्वीचा खेळ तिथे (तिसऱ्या क्रमांकावर) खेळण्यासाठी साजेसा आहे. त्याच्यात खूप प्रतिभा असून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याची या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेली नाही, पण तो वाइल्ड कार्ड असू शकेल.

- Advertisement -

पृथ्वी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात

पृथ्वीने आतापर्यंत पाच कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या तो श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा भाग आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. परंतु, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला आवश्यक वाटल्यास पृथ्वीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकेल. या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -