घरदेश-विदेशकोरोनातून बरे झालेल्यांना आता हा धोका; ICMR च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

कोरोनातून बरे झालेल्यांना आता हा धोका; ICMR च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Subscribe

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला.

नवी दिल्ली : कोरोना महामारी म्हणजे मानवी जीवनात येऊन गेलेले एक वाईट स्वप्नच. आता कोरोना हद्दपार होत आहे. मात्र, ज्यांना कोरोना होऊन गेला त्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परीणाम होत आहेत आणि ते व्यक्ती कोणत्या आजाराला बळी पडत आहे याबाबत आयसीएमआर (ICMR) ने एक अभ्यास अहवाल आणला असून, या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Now this danger to those who have recovered from Corona; Shocking information comes out from the report of ICMR)

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला. कोरोनापश्चात आरोग्य स्थितीचे संशोधन करून महत्त्वपूर्ण अनुमान काढले असून, त्यांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

असे करण्यात आले संशोधन

आयसीएमआरने कोरोनानंतरच्या आजारांची स्थिती दर्शविणाऱ्या अहवालावर काम केले. त्यासाठी त्यांनी देशातील 31 रुग्णांलयातील तब्बल 14 हजार 419 कोरोना रुग्णांवर संशोधन केले. यामध्ये सप्टेंबर 2020 पासून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा या संशोधनात सहभाग होता. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनाचा मूळ डेल्टा आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, असा आयसीएमआरचा अंदाज आहे. मध्यम ते गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांवर या संशोधनात भर देण्यात आला आहे.

हेही वाचा : चांद्रयान – 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग; ‘त्या’ दिवशी जन्मलेल्या मुलाच ठेवले ‘हे’ नाव

- Advertisement -

मृत्यूची शक्यता तीनपटीने वाढली

सर्वाधिक धक्कादायक म्हणजे कोरोना काळात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी अनेकांना चिंतित करणारी जरी असली तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूव्यतिरिक्त 17.1 टक्के रुग्णांमध्ये कोरोनापश्चात आरोग्यविषयक तक्रारी दिसून आल्या आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर 17.1 टक्के रुग्णांना थकवा, श्वास घेण्यास अडचण, धाप लागणे, एकाग्रता मंदावणे अशी लक्षणे आढळली आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर ज्या रुग्णांना कोरोनापश्चात आजारांचा त्रास जाणवला त्यांच्या मृत्यूची शक्यता तीन पटींनी वाढली असल्याचा ICMR च्या अहवालातून पुढे आला आहे.

हेही वाचा : …हा तर राष्ट्रवादीचा मोठा गेम, पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडूंचा प्रहार

लहान मुलांच्या सर्वाधिक मृत्यूचा धोका

आयसीएमआरने काढलेल्या निष्कर्षात लहान मुलांबाबती महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर 0 ते 18 वयोगटातील लहान मुलांमध्ये 5.6 पटींनी मृत्यूचा धोका असल्याचे पहिल्या चार आठवड्यांत तपासणी केल्यानंतर आणि वर्षभरात केलेल्या पाठपुराव्यानंतर लक्षात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -