घरमहाराष्ट्रजुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बसचा अपघात; ५ जण ठार तर ४० जखमी

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बसचा अपघात; ५ जण ठार तर ४० जखमी

Subscribe

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बोरघाटात बस दरीत कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खासगी बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बोरघाटात बस दरीत कोसळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका अडीच वर्षीय बालकासह, एक युवती, एक पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे. सर्वज्ञा सचिन थोरात (वय २- कराड), स्नेहा पाटील (वय-१५, घाटकोपर), जनार्दन पाटील (वय-४५), संजय शिवाजी राक्षे (वय-५०, पवई), आणि एका महिलेची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवाशांचे प्राण वाचवले. या अपघातात जखमी झालेल्यांवर खोपोली नगरपरिषद आणि निगडी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बसमधून जवळपास ५० ते ६० प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान महामार्ग पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. आज पहाटे ही घटना घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -