घरCORONA UPDATEOmicron Symptoms : लसवंतांमध्ये दिसतायत ओमिक्रॉनची 'ही' लक्षणे, तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

Omicron Symptoms : लसवंतांमध्ये दिसतायत ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणे, तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

Subscribe

जगभरात एका आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. यात ओमिक्रॉनमुळे धोका अधिक वाढल्याचे म्हटले जातेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक देशांमध्ये झपाट्याने पसरणाऱ्या संसर्गामागे ओमिक्रॉन व्हेरिएंट कारणीभूत ठरल्याचे म्हटले जातेय. या बाबतीत त्याने डेल्टालाही मागे टाकले आहे. यात ओमिक्रॉन दोन ते तीन दिवसांत संसर्गाची प्रकरणे दुप्पट होत आहेत. भारतातही ओमिक्रॉनचे ७८० रुग्ण आढळून आले आहेत.

ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे, परंतु सावध रहा

यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील एका अभ्यासानुसार, जगभरात ओमिक्रॉनची सौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र भारतासह अनेक देशांमध्ये याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यात न्यू ईअर सेलिब्रेशन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर खबरदारी म्हणून लसीकरण आणि चाचणीचा वेग वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

घसा आणि अंगदुखी?

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचे पहिला रुग्ण सापडला तेव्हा तेथील वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी सांगितले की, ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये जास्त गंभीर लक्षणे आणि परिणाम आढळले नाहीत. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी प्राणघातक आहे.

डॉ कोएत्झी यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनबाधित रुग्णांना गळ्यात वेदना होत नाहीत तर घश्यात असामान्य वेदना होत आहेत. ही दोन्ही लक्षणे काहीशी सारखीच असू शकतात, परंतु यापैकी एकामध्ये घश्यात जळजळ जाणवते, तर दुस-यामध्ये जास्त वेदना होतात. दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. उनबेन पिल्ले यांनी आणखी एक लक्षणं नोंदवले, ज्यामध्ये ओमिक्रॉनबाधित व्यक्तीला रात्री खूप घाम येतो शिवाय शरीरात तीव्र वेदना जाणवत आहेत.

- Advertisement -

ही सर्व लक्षणे सर्दी किंवा थंडीमुळे देखील दिसू शकतात, परंतु डॉक्टरांनी ताबडतोब आरटी-पीसीआर चाचणी करण्याची आणि लोकांपासून अंतर राखण्याची शिफारस केली आहे. चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह येईपर्यंत अशा लोकांना क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

ओमिक्रॉनची असामान्य लक्षणे

ताप, खोकला, थकवा, वेदना ही देखील ओमिक्रोनची लक्षणे असू शकतात, परंतु काही असामान्य लक्षणे देखील असू शकतात. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील जेनेटिक एपिडेमियोलॉजी विभागातील प्राध्यापक टिम स्पेक्टर यांच्या मते, लसीकरण पूर्ण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या लोकांमध्ये ओमिक्रॉनची दोन असामान्य लक्षणे दिसू शकतात. जसे की उलट्या होणे आणि भूक न लागणे. तर काहींना सौम्य ताप, उलट्या, घसा खवखवणे आणि डोकेदुखीची तक्रार केली आहे.


Omicron Variant : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव! मुंबई, दिल्लीत एक दिवसात रुग्णसंख्या झाली दुप्पट


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -