घरमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींसोबत भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेसाठी चर्चा, शरद पवारांनीच दिली माहिती

पंतप्रधान मोदींसोबत भाजप-राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेसाठी चर्चा, शरद पवारांनीच दिली माहिती

Subscribe

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०५ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप सत्तेपासून वंचित राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुणाच्याही धअयानीमनी नसताना विचारांची विरुद्ध टोकं असताना राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, हे सरकार स्थापन करण्यापूर्वी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्यात भाजप-राष्ट्रवादी सत्ता स्थापनेवर चर्चा झाल्याची माहिती शरद पवारांनी दिली. शरद पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी अशी पंतप्रधान मोदींची इच्छा होती, असं शरद पवार यांनी सांगितलं. पुढे बोलताना मोदीं सोबतच्या भेटीत काय झालं ते शरद पवारांनी सांगितलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये अंतर वाढलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपला राष्ट्रवादीची गरज वाटली असेल. यावेळी दिल्लीत झालेल्या भेटीत आपली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील परिस्थितीवर चर्चा झाली, असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच, त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीने राज्यात एकत्र यावं अशी मोदींनी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मी त्यांना हे शक्य होणार नाही असं सांगतिलं. आम्हाला तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही. आपली भूमिका वेगळी आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला अजून विचार करण्याचा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक युतीत लढलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु होती. या दोन पक्षांच्या भांडणात दीड महिना कोणतंही सरकार स्थापन होऊ शकलं नव्हतं. शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पद हवं होतं, मात्र भाजपला ते द्यायचं नव्हतं. मग अशा वेळी भाजपने राष्ट्रवादी पक्षाकडेही सत्तेसाठी चाचपणी केली. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्लीत भेट झाली होती.

शरद पवारांनी भाजपला नकार दिला तेव्हा उपस्थित होतो – नवाब मलिक

२०१९ मध्ये भाजपचा राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा आग्रह होता हे पवारसाहेबांनी सांगितले हे खरं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. भाजपने सरकार बनवण्याबाबत आग्रह धरल्यानंतर पक्षातंर्गत बैठक होऊन भाजपसोबत सरकार न बनवण्याचा निर्णय झाला आणि हे पवारसाहेबांनी मोदींना संसदेच्या संयुक्त सभागृहात सांगितले त्यावेळी मी उपस्थित होतो हे सत्य आहे असेही नवाब मलिक म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार बनवण्याचा भाजपचा आग्रह होता मात्र या आग्रहाला पवारसाहेबांनी स्पष्ट नकार दिला होता असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -