घरदेश-विदेश"एक दिवस देशात पेट्रोल आणि डिझेल पंप नसतील", नितीन गडकरींचे मोठे विधान

“एक दिवस देशात पेट्रोल आणि डिझेल पंप नसतील”, नितीन गडकरींचे मोठे विधान

Subscribe

नवी दिल्ली :  एक दिवस देशात पेट्रोल आणि डिझेल पंप नसतील. त्याऐवजी आपण इलेक्ट्रिक वाहनांसाठी इथेनॉल पंप आणि चार्जिंग स्टेशन असतील, अशी भविष्यवाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केले आहे. यावेळी नितीन गडकरी हे एनडीटीव्हीच्या ‘बनेगा स्वस्थ भारत’ या मोहिमेसाठी अभिनंदन देखील केले आहे.

एनडीटीव्हीच्या ‘बनेगा स्वस्थ इंडिया’ सीझन 10 दरम्यान ग्रीन व्हिजन शेअर करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. एक दिवस असा येईल की, जेव्हा पेट्रोल आणि डिझेल पंप नसतील. त्याऐवजी आम्ही इलेक्ट्रिक वाहनांसाठी इथेनॉल पंप आणि चार्जिंग स्टेशन असतील. एलएनजी आणि सीएनजी परालीपासून तयार होतील. कार्बन डाय ऑक्साईडपासून इथेनॉल तयार करण्याचा केंद्राचा प्रकल्प आहे. आम्ही हळूहळू निर्माण होणारा कचरा आणि प्रदूषण कमी करू. आपण एक निरोगी राष्ट्र निर्माण करू शकतो. कार्यरत घटकांपासून मूल्य निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान.”

- Advertisement -

हेही वाचा – कुख्यात दहशतवादी शाहनवाझ NIA च्या जाळ्यात; ISIS संबंधित तीन जण अटकेत

एनडीटीव्ही इंडियाच्या ‘बनेगा स्वस्थ भारत मोहिमे’ सहभागी नितीन गडकरींनी होतात. यावेळी आरोग्यसाठा काम करणे आणि आपल्या समाजात नैतिकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण हे तीन महत्त्वाचे स्तंभ असून वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहेत. यामुळे केंद्र सरकार असे धोरण आणत आहे, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असेही गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – ऋषी सुनक भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण… ठाकरे गटाची जोरदार टीका

घनकचरा वापर करून रस्ते बांधण्यासाठी वापरणार

प्रदूषणाच्या दुष्परिणामांचा उल्लेख करताना नितीन गडकरी म्हणाले की, दिल्लीसारख्या शहरातील प्रदूषणाचा अभ्यास केल्यानंतर कळाले की, आपले आयुष्य 10 वर्षांनी कमी होत असल्याचे समजले. त्यामुळे महात्मा गांधींनी सुरू केलेले स्वस्थ भारत अभियान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे अभियान गांभीऱ्याने पुढे नेले. आज आम्ही संकल्प केला आहे की, आपल्याकडील घनकचरा वापर करून रस्ते बांधण्यासाठी वापरणार आहोत. यासाठी संपूर्ण देशात एक एक पॉलिसी लॉन्च करत आहेत.” पुढे नितीन गडकरी म्हणाले की, कोणतेही साहित्य निरुपयोगी नसते आणि कोणतीही व्यक्ती निरुपयोगी नसते. हे योग्य तंत्रज्ञान आणि नेतृत्वाच्या दृष्टीवर अवलंबून आहे की तुम्ही कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -