घरदेश-विदेशऋषी सुनक भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण... ठाकरे गटाची जोरदार टीका

ऋषी सुनक भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण… ठाकरे गटाची जोरदार टीका

Subscribe

मुंबई : भारत आणि कॅनडात खलिस्तानवरून तणाव वाढत असतानाच कॅनडातील खलिस्तानची आग लंडनपर्यंत पोहोचली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक भारतीय वंशांचे ‘प्राऊड हिंदू’ आहेत, पण या ‘प्राऊड हिंदू’ने त्यांच्या भूमीवर वळवळणारे भारतविरोधी शेपूट ठेचले नाहीच व साधा दमही दिलेला दिसत नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – सरकारकडे परदेशवाऱ्यांवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा असेल तर…, आदित्य ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल

- Advertisement -

‘जी-20’साठी दिल्लीत जमलेल्या जागतिक मेळ्यात कॅनडाचे पंतप्रधान ‘ट्रुडो’ होते. ट्रुडो यांना पंतप्रधान मोदी यांनी कॅनडातील खलिस्तानी आश्रयस्थानाबाबत जाब विचारल्याची माहिती भक्तांनी पसरवली, पण त्याच वेळी इंग्लंडच्या पंतप्रधानांना लंडनमध्ये फोफावत असलेल्या त्याच भारतविरोधी कारवायांवर जाब विचारण्याचे पंतप्रधानांना सुचले नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखातून लगावला आहे.

कॅनडाप्रमाणेच लंडनही खलिस्तान समर्थक शिखांचा अड्डा बनला आहे, पण इंग्लंडचे पंतप्रधान सुनकसाहेब हे भारतीय वंशाचे तसेच सनातन धर्माचे पालनकर्ते, ‘प्राऊड हिंदू’ असल्याने लंडनमधील खलिस्तानी कारवायांवर त्यांना प्रश्न विचारले जात नाहीत. आता तर सुनकसाहेब क्रिकेट वर्ल्ड कपचा आस्वाद घेण्यासाठी भारतात येणार आहेत. भारतविरोधी कारवायांत लिप्त असलेल्या पाकिस्तान, कॅनडा, बांग्लादेशसारख्या देशांना वेगळा न्याय व इंग्लंडला दुसरा न्याय ही कोणती नीती? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – याचा अर्थ पेपर फुटला आहे… धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा टोला

लंडन किंवा कॅनडाच नाही, पश्चिमी देशांतील अनेक भागांत खलिस्तान समर्थक सक्रिय झाले आहेत. त्यांची सक्रियता हिंसक आणि आव्हानात्मक आहे. खलिस्तान समर्थक ब्रिटनमधील राष्ट्रवादी भारतप्रेमी शिखांना धमक्या देत आहेत व तेथील पोलीस ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. खलिस्तानवादी हे हिंसेचे निष्ठावंत पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या मागण्या काय, त्यांचा राष्ट्रीय विचार काय, सामाजिक भूमिका काय याविषयी वैचारिक गोंधळ आहे, पण ‘खलिस्तान’ हवे व घेणार हीच त्यांची मागणी आहे. अर्थात हिंसाचार करून त्यांची मागणी कशी पूर्ण होणार? असा प्रश्नही ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -