घरदेश-विदेशव्हिडीओ कॉलवर 'कबूल है...' १२ जोडप्यांनी केला ऑनलाईन निकाह!

व्हिडीओ कॉलवर ‘कबूल है…’ १२ जोडप्यांनी केला ऑनलाईन निकाह!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत मुस्लीम समाजाकडून संपुर्ण विधीसह ऑनलाईन निकाह पार पाडला आहे

कोरोना व्हायरसचा परिणाम लग्न सोहळ्यांवर देखील झाल्याचे पाहिला मिळत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपुर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याने बरेच धार्मिक कार्यक्रम तसेच विवाह सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी आदर्श घेण्यासारखे विवाह सोहळे पार पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एप्रिल महिन्यात लग्न समारंभ तसेच निकाह आयोजित करण्यात येतात, मात्र यंदा देशभर कोरोनाचे सावट असल्याने सगळ्याच ठिकाणी शांतता आहे.

- Advertisement -

मुस्लीम समाजात दरवर्षी एप्रिल महिन्यात सामुहिक निकाह संमेलनाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे यावेळी हे शुभ प्रसंग कमी प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. मात्र अशापरिस्थितीत मुस्लीम समाजाकडून ऑनलाईन निकाह पार पडत आहेत. मध्यप्रदेशच्या गुनामध्ये कोरोनाचे संकट असताना मुस्लीम समाजाने १२ जोडप्यांचा ऑनलाईन विवाह सोहळा पार पाडल्याचे समोर आले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत या मुस्लीम समाजाकडून संपुर्ण विधीसह ऑनलाईन निकाह पार पाडला आहे.

- Advertisement -

शहारच्या काजी नूरुल्लाह युसूफजई यांनी क़ाज़ी कार्यालयात व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून रिती-रिवाजासह निकाह केला. ऑनलाईन लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या १२ वधू-वराला व्हिडीओ कॉलद्वारे ‘कबूल है…’ असं म्हणत या लग्नास सहमती दर्शविली.


बायको अडकली माहेरी, नवऱ्याने प्रेयसीलाच लग्न करून आणलं घरी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -